मीडियामध्ये दलित शब्दावर बंदी घालणे अयोग्य-रामदास आठवले

दलित शब्दाच्या सार्वजनिक वापरावर ; बोलण्यावर; मीडियातील बातम्यांमध्ये दलित शब्दावर बंदी आणणे योग्य ठरणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2018 07:30 PM IST

मीडियामध्ये दलित शब्दावर बंदी घालणे अयोग्य-रामदास आठवले

मुंबई, 5 सप्टेंबर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी कामकाजात दलित शब्द वापरण्यास बंदी घालणारा दिलेला निर्णय योग्य असून मीडियामध्ये मात्र दलित शब्द वापरण्यावर बंदी घालणे योग्य होणार नाही असं मत रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. तसंच याबाबत नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध रिपब्लिकन पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे रामदास आठवले यांनी जाहीर केलंय.

मीडियामध्ये दलित शब्द वापरण्यास बंदी आणणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचंही रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केलंय.

दलित शब्दाच्या सार्वजनिक वापरावर ; बोलण्यावर; मीडियातील बातम्यांमध्ये दलित शब्दावर बंदी आणणे योग्य ठरणार नाही. दलित हा शब्द फक्त अनुसूचित जातींसाठी वापरला जात नाही. दलित शब्दाचा अर्थ व्यापक अर्थाने आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वंचित शोषित पीडित समस्त वर्गासाठी तथा आदिवासींच्या अंतर्भावासह दलित शब्द वापरला जातो असं आठवले यांनी सांगितलं.

जे लोक आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत पीडित आहेत शोषित आहेत ते कोणत्याही जाती धर्माचे असोत त्यांच्यासाठी आम्ही दलित शब्द वापरून भारतीय दलित पँथर हे संघटन महाराष्ट्रात स्थापन केले. दलित पँथर या आक्रमक संघटनेने दलितांवरील अन्यायाचा प्रतिकार केला. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्व शोषित मागासवर्गीयांना एकत्र करून त्यांना अन्यायाचा प्रतिकार करण्याची अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दलित या शब्दामुळेच मिळत होती. त्यामुळेच दलित पँथर हे संघटन आम्ही स्थापन केले असं आठवले म्हणाले.

Loading...

त्यामुळे दलित हा शब्द नकारात्मक नसून तो दलितांना लढण्याचीच प्रेरणा देणारा शब्द असल्यामुळे मीडियामध्ये तो शब्द वापरण्यावर सरसकट बंदी घालणे योग्य ठरणार नाही असं मत रामदास आठवले आज केलं.

सरकारी कामकाजात दलित शब्द वापरण्यास बंदी घालणे योग्य असून मीडियामध्ये मात्र दलित शब्द वापरण्यास नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय योग्य नाही. या निर्णयाविरुद्ध रिपब्लिकन पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं आठवलेंनी जाहीर केलं.

Success Story: रिक्षावाल्याच्या मुलीने देशाला दिले सुवर्णपदक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...