‘महाराष्ट्रात भाजपने नाही तर सत्तेसाठी शिवसेनेने विश्वासघात केला’, फडणवीसांचा मोठा आरोप

‘महाराष्ट्रात भाजपने नाही तर सत्तेसाठी शिवसेनेने विश्वासघात केला’, फडणवीसांचा मोठा आरोप

'महाराष्ट्रातलं सरकार हे निरंकूश झालं आहे. आपल्याविरुद्ध बोलणाऱ्यांना, लिहिणाऱ्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं आहे. राज्यात अघोषित आणीबाणी लादली आहे.'

  • Share this:

मुंबई 11 नोव्हेंबर: बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ झाला आहे. त्यामुळे जास्त जागा मिळाल्यातरी मुख्यमंत्री हे नितीशकुमारच  (CM Nitishkumar)असतील असतील असं भाजपने जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शब्द दिला होता आणि आम्ही तो पाळणार आहोत असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज स्पष्ट केलं. महाराष्ट्रात असा कुठलाही शब्द आम्ही दिला नव्हता. सत्तेसाठी भाजपने नाही तर शिवसेनेने (Shivsena) विश्वासघात केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. ‘न्यूज18 इंडियाला’ दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

फडणवीस म्हणाले, आम्हाला जागा कितीही मिळाल्या तरी मुख्यमंत्री हे नितीशकुमारच राहतील असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही शब्दाला जागणारे आहोत. नितीशकुमार यांची प्रतिमा ही स्वच्छ आहे. सत्तेसाठी आम्ही हपापलेले नाही असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातलं सरकार हे निरंकूश झालं आहे. आपल्याविरुद्ध बोलणाऱ्यांना, लिहिणाऱ्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं आहे. राज्यात अघोषित आणीबाणी लादली आहे असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. महाराष्ट्रातलं सरकार जावं असा प्रयत्न आम्ही करणार नाही. अशा प्रकारची सरकारं हे देशात कधीच जास्त काळ टीकली नाहीत. आपसातल्या अंतर्विरोधानेच हे सरकार कोसळून पडेल असंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या त्या योजनांचा फायदा भाजप आणि एनडीएला झाला आहे. सर्वच कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतले त्यामुळे भाजपला हे यश मिळालं असंही त्यांनी सांगितलं. एवढी वर्ष सरकार चालविल्यामुळे थोड्या फार प्रमाणात सरकारविरोधात वातावरण असतं. मात्र नितीशकुमार यांची प्रतिमा ही स्वच्छ होती, डागाळलेली नव्हती असंही ते म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 11, 2020, 4:40 PM IST

ताज्या बातम्या