Home /News /mumbai /

'सार्वजनिक ठिकाणी नपुंसक म्हणणं अपमानास्पद'; पत्नीच्या हत्या प्रकरणात कोर्टाकडून आरोपीची सुटका...

'सार्वजनिक ठिकाणी नपुंसक म्हणणं अपमानास्पद'; पत्नीच्या हत्या प्रकरणात कोर्टाकडून आरोपीची सुटका...

पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीची हायकोर्टाने सुटका केली आहे.

    मुंबई, 10 फेब्रुवारी : मुंबई हायकोर्टाने (Mumbai high court) पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पतीची सुटका केली आहे. सार्वजनिक ठिकाणी नपुंसक म्हणणं कोणाही व्यक्तीसाठी लज्जास्पद बाब असते. कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पती कामावर जात होता तेव्हा त्याची पत्नी उलटसुटल म्हणू लागली आणि तीन मुलं असतानाही नपुंसक म्हणाली. या प्रकरणात आरोपीवर पत्नीच्या हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठाने पंढरपूर निवासी नंदू सुरवासे याला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली बरी केली आहे. कोर्टाने या प्रकरणात त्याला कोणतीही शिक्षा सुनावली नाही. कोर्टाने त्याला दिलेली तुरुंगातील शिक्षाही हटवली आहे. आतापर्यंत त्याने 12 वर्षांची शिक्षा भोगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदूचं लग्न 15 वर्षांपूर्वी झालं होतं. त्याला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. काही घरगुती वादावरुन चार वर्षांपासून ते वेगवेगळे राहत होते. यादरम्यान ऑगस्ट 2009 मध्ये त्याची पत्नी शकुंतलासोबत एक बस स्टॉपवर त्याची भेट झाली. नंदूचं म्हणणं आहे की, या भेटीनंतर पत्नीने त्याचा रस्ता अडवला होता आणि त्याची कॉलर पकडून शिव्या देऊ लागली. इतकच नाही तर त्याला वारंवार नपुंसक म्हणू लागली. हे ही वाचा-60 वर्षीय व्यक्ती चिमुरडीला एकीकडे नेत करीत होता छेडछाड; अखेर पोलिसांनी.... पीठाने सांगितलं की, नंदूला तीन मुलं आहेत. बस स्टॉपवर झालेल्या प्रकारामुळे आरोपीच्या स्वाभिमानाला धक्का बसला. पीठाने पुढे सांगितलं की, ही टिप्पणी न केवळ स्वत:साठी मात्र सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद आहे. पीठाने सांगितलं की, ही घटना एक पब्लिक प्लेसवर झाली होती. पत्नीने नपुंसक म्हटल्यामुळे पतीला लाज वाटली. या प्रकरणावर निर्णय सुनावताना आरोपीला कोर्टाने बरी केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Mumbai, Mumbai high court, Murder

    पुढील बातम्या