मुंबईच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांची समज, बदल्यांवरून पडली होती वादाची ठिणगी

मुंबईच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांची समज, बदल्यांवरून पडली होती वादाची ठिणगी

मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विश्वासात न घेता एवढा मोठा निर्णय कसा घेतला याची चर्चा आता सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई 6 जुलै: मुंबई पोलीस दलातल्या 10 ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात दोन दिवसांपासून घमासान सुरू होतं. मुंबईत कोरोनाचं संकट असतांनाच या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर तीनच दिवसांनी त्या सर्व बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या होत्या. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बदल्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांनीच परस्पर केल्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना समज दिल्याचं सांगितलं जातंय.

या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मुंख्यमंत्र्यांच्या भावना त्यांना सांगितल्या.

असे महत्त्वाचे निर्णय घेतांना आवश्यक त्या सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे असं मत मुख्यमंत्र्यांचं होतं अशी माहिती सूत्रांनी दिलीय. बदल्या रद्द केल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद झाल्याचीही चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्र्यांनी आपली पॉवर दाखवत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिल्याचंही बोललं जातं होतं.

मात्र मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विश्वासात न घेता एवढा मोठा निर्णय कसा घेतला याची चर्चा आता सुरू झाली आहे.

हे सर्व अधिकारी ही DCP दर्जांचे होते. त्यामुळे या बदल्या करताना गृहमंत्र्यांना विश्वासात घेणं आवश्यक असतं. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर बैठकांचं सत्र पार पडलं. शरद पवार, अजित पावर यांच्यासह अनेक नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.

या बैठकांनंतर चक्र आणखी वेगात फिरलं आणि संध्याकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बोलावून घेतलं होतं.

 

 

Published by: Priyanka Gawde
First published: July 6, 2020, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading