मुंबईत हायअलर्ट!, समुद्रामार्गे 'आयएस'चे 3-4 दहशतवादी घुसल्याचा संशय

आयसिस या दहशतवादी संघटनेने मुंबईत 26/11 सारखा हल्ला घडवण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2017 09:32 AM IST

मुंबईत हायअलर्ट!, समुद्रामार्गे 'आयएस'चे 3-4 दहशतवादी घुसल्याचा संशय

05 एप्रिल :  आयसिस या दहशतवादी संघटनेने मुंबईत 26/11 सारखा हल्ला घडवण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. आयसिसचे तीन दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत प्रवेश करुन हल्ला घडवू शकतात अशी शक्यता तटरक्षक दलाने वर्तवली आहे. यानंतर मुंबई पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

या संशयितांची माहिती किंवा नोंदणी क्रमांक सरकारच्या यादीतही नव्हते. त्यानुसार तटरक्षक दलाने समुद्रात गस्त वाढवली होती. त्याचवेळी सोमवारी वरळी तटरक्षक दल जिल्हा संख्या दोनला समुद्रात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर तातडीने तटरक्षक दलाने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. तटरक्षक दलाने ‘आयएस’च्या तीन दहशतवाद्यांची माहिती फॅक्स आणि नियंत्रण कक्षाला दिली आहे.

दहशतवादी पुन्हा समुद्रामार्गे हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुंबईच्या समुद्रात गस्त वाढवण्यात आली असून मुंबई पोलिसांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 08:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...