S M L

'रिलायन्स फाऊंडेशन होलिस्टिक हिलिंग आर्ट प्रोजेक्ट'चं उद्घाटन

ईशा अंबानींनी नुकतंच 'होलिस्टिक हिलिंग' या आर्ट प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. ही आर्ट संकल्पना पहिल्यांदा सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सुरू केलीय. लोकांपर्यंत समकालीन कला पोचावी, यासाठी ही योजना आहे.

Sonali Deshpande | Updated On: Sep 25, 2017 07:30 PM IST

'रिलायन्स फाऊंडेशन होलिस्टिक हिलिंग आर्ट प्रोजेक्ट'चं उद्घाटन

मुंबई, 25 सप्टेंबर : ईशा अंबानींनी नुकतंच 'होलिस्टिक हिलिंग' या आर्ट प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. ही आर्ट संकल्पना पहिल्यांदा सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सुरू केलीय. लोकांपर्यंत समकालीन कला पोचावी, यासाठी ही योजना आहे. त्याचबरोबर हाॅस्पिटल्समधले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनाही या कलेचा अनुभव मिळावा, म्हणूनही ही योजना आहे. होलिस्टिक हिलिंगमध्ये समकालीन कलाकारांची कला पाहायला मिळते.

12 कलाकारांनी या प्रोजेक्टमध्ये भाग घेतलाय. यांनी सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा नजाराच बदलून दिला. हाॅस्पिटलच्या पॅसेजमध्ये अशी विविध चित्रांची रंगसंगती पाहायला मिळते. यामुळे हाॅस्पिटलचं वातावरण बदलून गेलंय.

रोहिणी देवशेर, शिल्पा गुप्ता, रीना कल्लात, सुहासिनी केजरीवाल,संदीप मुखर्जी,सचिन जाॅर्ज सेबस्टाइन, प्रणीत सोयी, ठुकराल अँड ताग्रा आणि राक्स मीडिया कलेक्टिव यांनी यासाठी काम केलंय. त्यांच्या कलाकृती हाॅस्पिटल्समध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळतील.या नव्या प्रोजेक्टबद्दल बोलताना ईशा अंबानी म्हणाल्या, 'होलिस्टिक हिलिंग प्रोजेक्ट हाॅस्पिटल्समधलं आणि बाहेरचं वातावरण बदलून टाकेल.त्याची सुरुवात सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरपासून झालीय. त्यासाठी आम्ही समकालीन कलाकारांसोबत काम करतोय.'

रिलायन्स फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे भारतीय कलेला एक व्यासपीठ मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 07:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close