मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अवमान? कायदेतज्ज्ञ म्हणतात...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अवमान? कायदेतज्ज्ञ म्हणतात...

ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी 'न्यूज18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रगीताबद्दल कायद्यात नेमकी काय तरतूद आहे या विषयी माहिती दिली.

ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी 'न्यूज18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रगीताबद्दल कायद्यात नेमकी काय तरतूद आहे या विषयी माहिती दिली.

ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी 'न्यूज18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रगीताबद्दल कायद्यात नेमकी काय तरतूद आहे या विषयी माहिती दिली.

मुंबई, 1 डिसेंबर : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या सध्या मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर आहेत. केंद्रात भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी त्यांनी मुंबईत महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना राष्ट्रगीताचा सन्मान राखण्याचा विसर पडल्याचा आरोप होतोय. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. पण त्या राष्ट्रगीत अर्धवटच बोलल्या. इतकंच नाही तर ते माध्यमांसमोर राष्ट्रगीत खाली बसून गायल्या. राष्ट्रगीत खाली बसून बोलणं किंवा अर्धवट बोलणं हा कायद्याने गुन्हा आहे याचा विसर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पडला. त्यामुळे ममता दीदींकडून राष्ट्रगीतचा अवमान झाला, असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय. त्यावर कायदेतज्ज्ञ नेमकं काय म्हणतात ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं?

ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. 'जन गण मन अधिनायक जय है', असं ते बसून म्हणाल्या. त्यानंतर ते बोलता बोलता जागेवरुन उठल्या. यावेळी त्या राष्ट्रगीच्या उर्वरित ओळी बोलू लागल्या. "भारतभाग्यविधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग", इथपर्यंतच त्या राष्ट्रगीत म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी 'जय महाराष्ट्र, जय बंगाल, जय भारत', अशी घोषणा केली.

कायदेतज्ज्ञ नेमकं काय म्हणताय?

ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी या प्रकरणावर 'न्यूज18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रगीताबद्दल कायद्यात नेमकी काय तरतूद आहे या विषयी माहिती दिली. "आपल्या राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्य नमूद केले आहेत. त्या मुलभूत कर्तव्यांमध्ये अनुच्छेद 51 (A) प्रमाणे राष्ट्रगीत, राष्ट्रीय झेंडा आणि राष्ट्रीय मानचिन्हांचा योग्य पद्धतीने आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे केंद्रीय पातळीवर असणारा Prevention of Insult National Honour Act या नावाचा 1971 सालाचा कायदा आहे. त्या कायद्यात कलम 3 असं म्हणतं की, एखाद्या ठिकाणी राष्ट्रगीत चालू असताना ते राष्ट्रगीत म्हणायला प्रतिबंध करणं किंवा जी लोकं राष्ट्रगीत म्हणत आहेत त्यांना अडथळा निर्माण केला तर तो गुन्हा धरला जातो. तसं केल्यास तीन वर्षापर्यंतची शिक्षा ठोठावली जाऊ शकते", अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर यांनी दिली.

हेही वाचा : 'केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण नको', चव्हाणांचा ममतादीदींना सल्ला

'ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करा', प्रवीण दरेकरांची मागणी

दरम्यान, संबंधित घटनेप्रकरणी ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. "राजकीय हव्यासापोटी आपलं राष्ट्रीय प्रेम, राष्ट्रीय हव्यास हा गहाण ठेवण्याचं काम ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यातून झालेलं दिसत आहे. कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की, जनगण म्हणताना अडथळा आणणे हाच गुन्हा आहे. पण त्यांनी त्यापेक्षा डबल गुन्हा केला आहे. एकतर त्या राष्ट्रगीत बोलताना बसलेल्या होत्या. त्यानंतर उठल्या आणि त्यांनी अर्धवट राष्ट्रगीत सोडलं. मला तर वाटतं, ममता बॅनर्जींवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे", असं प्रवीण दरेकर म्हणाले.

" isDesktop="true" id="637874" >

हेही वाचा : देशातली तिसरी आघाडी नेमकी आता कुणाच्या नेतृत्वात, शरद पवार-ममता बॅनर्जी यांचं एकत्र उत्तर

'तुमचं राजकारण देशाच्या स्वाभिमानापेक्षा मोठं नाही'

"देश प्रेमासाठी सगळं असतं. तुमचं राजकारण देशाच्या स्वाभिमानापेक्षा मोठं नसतं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सतर्कता दाखवावी. झालेला सर्व प्रकार तपासून घ्यावा. तात्काळ गुन्हा दाखल करावा. नाहीतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल असं मतं होईल की, प्रखर राष्ट्रभिमानी असलेले बाळासाहेबांचे चिंरजीव, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव जेव्हा देशाच्या बाबतीत राष्ट्रगीताचा अपमान होताना केवळ राजकारणापोटी ममतांना वाचवण्याचं काम केलं किंबहुणा दुर्लक्ष केलं, अशाप्रकारचे पापाचे धनी ते होऊ शकतात. म्हणून माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ममता बॅनर्जी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी आहे", अशी भूमिका दरेकरांनी मांडली.

First published:
top videos