मुंबई, 1 मे: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) पहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. तर कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा (Covid vaccination shortage) जाणवण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकार (Central Government)वर निशाणा साधला आहे.
देशाच्या जनतेला मरायला सोडलं आहे का?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं, केंद्र सरकारने देशातील जनतेला मरायला सोडलं आहे असं चित्र पहायला मिळत आहे. लसीकरण हा या संकटात एक मोठा दुवा ठरू शकतो, अनेकांचा जीव वाचवू शकतो.
नाना पटोले पुढे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली, सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची झालेली स्थिती पाहून सुप्रीम कोर्टानेही देशाच्या जनतेला मरायला सोडलं आहे का? असा संतप्त सवाल केला.
अनेक शहरे - गावे स्मशान झाली
जागतिक पातळीवर अनेक देशांनी हा प्रयोग केला आणि त्यात ते यशस्वी झाले पण आपल्या देशातील सरकारने काय केलं देशातील लस इतर देशांना पाठवली आपल्या विरोधात असलेल्या पाकिस्तानला सुद्धा पाठवली. देशातील अनेक शहर आणि गावे आज स्मशान झाल्याचं आपण पाहत आहोत.
...तर लशीचा तुटवडा निर्माण झाला नसता, अजित पवारांचा मोदी सरकारवर निशाणा
एवढा बेजबाबदार पंतप्रधान कुठेच झाला नाही
आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. सध्यातरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही ४.५ कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 1, 2021
आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. सध्यातरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही 4.5 कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही असंही नाना पटोले यांनी म्हटलं.
काँग्रेस कार्यकर्ते गरीब कुटुंबाना दत्तक घेणार
नाना पटोले यांनी म्हटलं, काँग्रेसने वैद्यकीय सहायता पुरवणे यासोबतच रक्तदान शिबिरे आयोजित करुन मदतीचे कार्य सुरू ठेवले आहे. लसीकरणाचा खर्च मोठा आहे त्याला हातभार म्हणून काँग्रेस कार्यकर्ते आपल्या परिसरातील गरीब कुटुंबाना दत्तक घेऊन स्वत:च्या व त्या कुटुंबाच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Modi government, Nana Patole