मुंबई, 18 सप्टेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी भावी सहकारी असं विधान केल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे (bjp) नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी युती करण्यासाठी शिवसेना (shivsena) असावीच असं आहे का? असं म्हणत चर्चेला पूर्णविराम दिला. तसंच, हे सरकार कुठल्याही क्षणी पडणार आहे, असं भाकितही राणेंनी वर्तवलं.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची बैठक पार पडली. 'येणाऱ्या सर्व निवडणूक भारतीय जनता पार्टीने जिंकायाच्या आहेत असा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला, अशी माहिती राणेंनी दिली.
त्यानंतर राणेंनी आपला मोर्चा शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडे वळवला. 'संजय राऊत कोण आहे? त्याच्या प्रश्नाला मी का उत्तर देवू? ते काय माझे बॉस आहेत का, जी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ. संजय राऊत नेमके काय बोलता हे त्यालाच विचारावं' असा टोलाही राणेंनी लगावला.
मस्करी जिवावर बेतली, हेडफोन दिला नाही म्हणून तरुणाची हत्या, उल्हासनगरमधील घटना
'भाजप आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा होत आहे, असं विचारलं असताना राणे म्हणाले की, कोणती युती आणि कुणाबरोबर होणार आहे? याबद्दल काही माहिती नाही. युती करायला काय शिवसेनाच असावी, चंद्रकांत पाटील यांना मंत्री होण्यासाठी शिवसेनाच युती करण्यासाठी असावी असं काही आहे का? असं सूचक विधानही राणे यांनी केलं.
तसंच, 'हे सरकार पडणार आहे. यांच्यातील अंतर्गत वादामुळे हे सरकार पडणार आहे. मी काही वेळ दिला नव्हता ही याच दिवशी हे सरकार पडणार आहे. पण, आता लवकरच आणि कुठल्याही क्षणी हे सरकार पडणार आहे', असंही राणे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीमध्ये आणू नये अशी भूमिका मांडली होती. यावर राणे म्हणाले की, 'पेट्रोल-डिझेलचे दर कोण ठरवणार? अजित पवार यांचा काय संबंध आहे? असा सवालच राणेंनी उपस्थितीत केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.