मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'संजय राऊत हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहे का? नाना पटोलेंनी फटकारलं

'संजय राऊत हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहे का? नाना पटोलेंनी फटकारलं

'मीडियामध्ये कसं राहता येईल आणि महाराष्ट्राला कसं बदनाम करता येईल हेच टार्गेट देवेंद्र फडणवीसांचं आहे'

'मीडियामध्ये कसं राहता येईल आणि महाराष्ट्राला कसं बदनाम करता येईल हेच टार्गेट देवेंद्र फडणवीसांचं आहे'

'मीडियामध्ये कसं राहता येईल आणि महाराष्ट्राला कसं बदनाम करता येईल हेच टार्गेट देवेंद्र फडणवीसांचं आहे'

मुंबई, 25 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter)  यांच्या पत्रावरून महाविकास आघाडी (MVA Government) आणि भाजपमध्ये (BJP) सामना रंगला असताना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या खंडाजंगी झाल्याचे समोर आले आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर क्रिकेटच्या भाषेत टीका केल्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही क्रिकेटच्या भाषेतच देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले आहे.

‘माझ्या स्वार्थासाठी चित्रपटाचं शूटिंग वारंवार रद्द केलं’; सलमाननं केला खुलासा

'देवेंद्र फडणवीस कधी क्रिकेट खेळलेच नाहीत. मी बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंगमध्येही टॉपला होतो माझ्या कॉलेजमध्ये.  देवेंद्र फडणवीस यांचे सर्व राजकीय बॉल हे नो बॉल चाललेत. कारण ते कधी क्रिकेटच खेळले नाहीत. मीडियामध्ये कसं रहाता येईल आणि महाराष्ट्राला कसं बदनाम करता येईल हेच टार्गेट देवेंद्र फडणवीसांचं आहे' अशी टीका सुद्धा नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर केली.

'संजय राऊत हे युपीएचे सदस्य नाहीत. त्यांना राष्ट्रवादी पक्षाने प्रवक्ता केलं आहे का? हे आम्हाला समजल्यावर आम्ही उत्तर देऊ, असा खोचक टोला पटोले यांनी लगावला.

'महाविकास आघाडी सरकार पहिल्यापासूनच एकजूट आहे. हे सरकार पाच वर्ष चालणार. जे काही सध्या आरोप केले जात आहेत. त्याला उत्तर देण्याची योग्य वेळ महाविकास आघाडीने ठरवली आहे, त्यामुळे आता त्यांच्या उत्तराची सुरुवात झालेली आहे' असंही पटोले म्हणाले.

सेल्फीचं झालं निमित्त आणि एकाच वेळी दोघा सख्ख्या भावांची निघाली अंत्ययात्रा

आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाष्य केलं होतं. 'संयुक्त पुरोगामी आघाडी अधिक सशक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षापेक्षा वेगळा नेता हवा आहे. त्यामुळे मी नेहमी शरद पवार यांचे नाव घेत राहील आणि माझी मागणी नेहमी राहील, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे नाना पटोले यांनी पहिल्यांदाच आपल्या शैलीत राऊत यांना फटकारले आहे. राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर थोरात यांनी रितसर पत्र काढून राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला होता.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis, Maharashtra, Nana Patole, Paramvir sing, Sanjay raut