काय होणार महाराष्ट्रात? सत्ता स्थापनेचे हे आहेत अखेरचे 5 पर्याय!

काय होणार महाराष्ट्रात? सत्ता स्थापनेचे हे आहेत अखेरचे 5 पर्याय!

जाणून घेऊयात राज्यात नवे सरकार स्थापन करायचे असेल तर सध्याच्या परिस्थितीत कोणते पर्याय शिल्लक आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर: राज्यात सत्ता स्थापनेवरून सुरु असलेला गोंधळ संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा न मिळाल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यास आमंत्रण दिले आहे. पण राज्यातील सध्याची राजकीय घडामोड पाहता राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यास बोलवले असेल तरी ते खरच संख्याबळ असल्याचा पाठिंबा मिळवू शकतात का असा मुख्य प्रश्न आहे. राष्ट्रवादीला राज्यपालांनी 24 तासांची मुदत दिली आहे. भाजप, शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीला देखील जर सत्ता स्थापन करण्यास अपयश आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. जाणून घेऊयात राज्यात नवे सरकार स्थापन करायचे असेल तर सध्याच्या परिस्थितीत कोणते पर्याय शिल्लक आहेत.

LIVE अपडेट: सत्ता स्थापनेचा नवा खेळ; राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदावर दाव

पहिला पर्याय- राष्ट्रवादी काँग्रेसला आज रात्री 8.30पर्यंत राज्यपालांना सत्ता स्थापन करू शकते की नाही हे सांगावे लागणार आहे. राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा पाठिंबा मिळू शकतो. पण अशा परिस्थितीत देखील सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा आवश्यक ठरतो. शिवसेनेचा आतापर्यंतचा आग्रह हा मुख्यमंत्रीपदासाठीचा होता आणि आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीला जरी पाठिंबा दिला तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा हवा. सेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा आग्रह केला तर राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेचा प्रस्ताव नाकारू शकते.

दुसरा पर्याय- राष्ट्रवादीनंतर राज्यपाल काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवू शकतात. अशा परिस्थिती देखील चित्र फार स्पष्ट असेल असे नाही. काँग्रेसला राष्ट्रवादीचे समर्थन मिळू शकते. पण फक्त राष्ट्रवादीचे समर्थन मिळून उपयोगाचे नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला शिवसेनेच्या पाठिंब्या शिवाय सरकार स्थापन करणे शक्य होणार नाही. या दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका वेगवेगळी आहे. या शिवाय काँग्रेसला ही भीती देखील वाटते की शिवसेनाचा पाठिंबा घेतल्यास त्याचे मुस्लिम मतदार दूर जाऊ शकतो.

तिसरा पर्याय- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यास राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. पण जर काही दिवसांनी काँग्रेसचे मत परिवर्तन झाले आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली तर सेने सरकार स्थापन करू शकते.

चौथा पर्याय- भाजपने भलेही सरकार स्थापन करण्यास नकार दिला असला तरी परिस्थिती बदलू शकतात. अन्य सर्व पक्षांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यास भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा प्रयत्न करु शकते.

पाचवा आणि अखेरचा पर्याय- राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर देखील राज्यपालांना वाटले की कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही तर अशा परिस्थिती राज्यात पुन्हा नव्याने निवडणुका होऊ शकतील.

SPECIAL REPORT: सत्ता स्थापनेवरुन नेटिझन्सनी शिवसेनेला केलं ट्रोल; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

First Published: Nov 12, 2019 10:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading