ट्विटरवर छेडलं मँगोवॉर… फळांचा राजा आंबा पण आंब्यांचा राजा कोण?

ट्विटरवर छेडलं मँगोवॉर… फळांचा राजा आंबा पण आंब्यांचा राजा कोण?

आंबा...फळांचा राजा हे नाव सार्थ करणारं फळ! हापूस आंब्याचा (Alphonso Mango) राजेशाही थाट, अप्रतिम चव, स्वाद आणि त्याला साजेसा असलेला त्याचा भावयांमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली,की'पेट्या' आणि 'खोके' या शब्दांची देवघेव वाढते.

  • Share this:

मुंबई 12 एप्रिल: उन्हाळी हंगाम अखेर सुरू झाला आहे. भारतातला उन्हाळा म्हणजे काही ठिकाणीघामाची प्रचंड चिकचिक आणि काही ठिकाणी अंगातलं सगळं पाणी शोषून घेणारीउष्णता;पण असं असलं तरीही उन्हाळा यावा असं अनेकांना वाटत असतं. कारणउन्हाळ्यात फळांच्या राजाचं आगमन होतं ना! आंबा हे देशातल्या लोकप्रियफळांपैकी एक असून, 2018-19 मध्ये त्याचं उत्पादन 21.37टन एवढं होतं.

आंबा...फळांचा राजा हे नाव सार्थ करणारं फळ! हापूस आंब्याचा (Alphonso Mango) राजेशाही थाटअप्रतिम चवस्वाद आणि त्याला साजेसा असलेला त्याचा भावयांमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली,की'पेट्या'आणि'खोके'या शब्दांचीदेवघेव वाढते. त्याच्याभोवती असलेलं लोकप्रियतेचं वलय फार मोठं आहे.त्याच्या या सगळ्या नखऱ्यांमुळे हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात यायलावेळ लागतो;पण विविधता हे भारताचं वैशिष्ट्य आंब्यांतही पाहायला मिळतं.वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या जातीचे आंबे मिळतात;पण यातला श्रेष्ठ कोण?हे ठरवणार कोण?सध्या नेटिझन्सनी हे ठरवण्याचा जणू विडाच उचललाय आणिवेगवेगळ्या आंब्यांच्या समर्थकांमध्ये सध्या ट्विटरवर चक्क युद्ध सुरूआहे...#MangoWarsया नावाने...

देशभरात वेगवेगळ्या राज्यांतवेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची लागवड आहे. महाराष्ट्रातला हापूस आंबादेशभरच नव्हे,तर जगभर लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेशातला दशेरी (Dusheri),पश्चिम बंगालमधला हिमसागर (Himsagar),आंध्र प्रदेशातला सफेदा (Safeda)यांसह चौसा (Chausa),केसर (Kesar),लंगडा (Langra),तोतापुरी (Totapuri),नीलम (Neelam)आणि अशा अनेक प्रकारचे आंबे हे भारताच्या वेगवेगळ्याराज्यांचं वैशिष्ट्य आहे.

जितक्या प्रकारचे आंबे आहेत,तितक्याप्रकारचे आंबेप्रेमी (Mangolovers)असणं साहजिकच;पण कोणता आंबा श्रेष्ठ हेठरवण्यासाठीचं मँगोवॉर सुरू झालं,ते एका ट्विटर युझरने केलेल्याट्विटनंतर.

'हापूस हा उगाचच जास्त भाव दिला गेलेला आंबा आहे.'ब्रँड कॉन्शस बाबा लोकां'ना खरा आंबा म्हणजे काय हे माहितीच नाही. त्यांनीदशहरी,चौसा,सफेदा आणि लंगडा/मालदा या जातींचे आंबे खाऊन पाहावेत,'अशाआशयाचं ट्विट त्या युझरने केलं. त्यानंतर त्या युझरने आपल्या एका मित्रालाटॅग करून हा मुद्दा पुढे न्यायला सांगितलं. त्यानंतर कोणत्या राज्यातलाकोणता आंबा चांगला,यावरून जणू युद्धच सुरू झालं. अनेकांनी हापूस आंब्यालाचमत दिलं.

'मला माफ कर फळांच्या राजा,कारण ते काय करतायत किंवा सांगतायत हे त्यांना कळत नाहीये,'असं ट्विट एकाने केलं.

'हापूसला कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा त्यामागे काही तरी अजेंडा नक्कीच आहे,'असं ट्विट आणखी एकाने केलं.

काहीजणांनी दशेरी आणि लंगडा जातीच्या आंब्यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं.काही जणांनी आपापल्या प्रदेशात आढळणाऱ्या स्थानिक जातींचे आंबेच (Local Mango Varieties)कसे श्रेष्ठ आहेत,हे ट्विट करून सांगितलं.

'जो मालदा नही खाया वो आम क्या खाया'असं ट्विट एका व्यक्तीने केलं.

कोण्या एकाने बंगनपल्ली/बेनिशान (Benganpalli/Benishan)जातीचा एकमेवाद्वितीय चवीचा आंबा एकदा तरी खाऊन पाहण्याचा आग्रह केला.

आंबाहा फळांचा राजा असला,तर आंब्यांचा राजा कोण,याचं उत्तर गुजरातमधल्याएकाने थेट एका ऑफरमधूनच दिलं.'तुमचा पत्ता मला पाठवा. दक्षिण गुजरातमधल्यामाझ्या स्वतःच्या बागेतले केसर (Kesar)आंबे मी पाठवून देतो. त्यानंतर हीचर्चा आणि मँगोवॉर निश्चितच संपुष्टात येईल,अशी मला खात्री आहे. दक्षिणगुजरातमधला केसर हा आंब्यांचा राजा म्हणून ओळखला जातो,'असं त्या युझरनेसांगितलं.

'दशेरीची गोडी कशालाच नाही. केसरही खूप चांगला आहे.हापूसच सर्वोत्तम आहे,असा दावा करणं चूक आहे. तसं कदाचित फक्तमहाराष्ट्रात असेल,'असं एका युझरने म्हटलं आहे.

प्रत्येकाने'आवडआपली आपली'सांगितल्यानंतर काही जणांनी मात्र सर्वसमावेशकत्वाची,समानतेचीभूमिका घेतली.'हर आम खास है। आम को आम ही रहने दें और नस्ल,किस्म में नाबाटे!'असं ट्विट एकाने केलं.

शेवटी आंबा तो आंबाच,मग तो कोणत्याका जातीचा असेना,अशी भावना यातून व्यक्त झाली. युद्धात शेवटी विजय कोण्याएका जातीच्या आंब्याचा नव्हे,तर आंबेप्रेमाचा झाला!

First published: April 12, 2021, 7:13 PM IST

ताज्या बातम्या