मुंबईत घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर पुलाचा लोखंडी गर्डर कोसळला

मुंबईत घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर पुलाचा लोखंडी गर्डर कोसळला

दुपारी ४ वाजेच्या सुमारास घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर शिवाजीनगर सिंग्नलजवळ ही घटना घडली.

  • Share this:

मनोज कुलकर्णी,प्रतिनिधी

मुंबई,20 आॅक्टोबर : मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर पुलाचा लोखंडी गर्डर कोसळलाय. शिवाजी नगर सिग्नलजवळ पुलाचं बांधकामं सुरू असताना ही दुर्घटना झाली. लोखंडी पुलाचा गर्डर कार आणि मोटरसायकलवर कोसळलाय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गर्डर कोसळल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालीये.

दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर सिंग्नलजवळ ही घटना घडली. लोखंडी पुलाचे बांधकाम सुरू होते. मात्र, कंत्राटदाराकडून योग्य ती काळजी न घेतल्यामुळे लोखंडी गर्डर कोसळल्याचं सांगण्यात येतंय. या गर्डरखाली एक कार आणि मोटारसायकल सापडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, नवी मुंबईकडे आणि नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. लोखंडी गर्डर काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गर्डर हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहे.

वाहतूक ठप्प

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड मार्गाने जर प्रवास करणार असला तर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वाहनधारकांनी एरोली किंवा ठाणे मार्गे नवी मुंबईला जाऊ शकता. तसंच नवी मुंबईकडून जर मुंबईकडे येणार असाल तर ठाणे आणि एरोली मार्गे आपण मुंबईकडे प्रवास करू शकता.

----------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2018 04:38 PM IST

ताज्या बातम्या