Home /News /mumbai /

खेळत असताना भलामोठा लोखंडी गेट अंगावर कोसळला, 7 वर्षांच्या चिमुरड्याचा करूण अंत

खेळत असताना भलामोठा लोखंडी गेट अंगावर कोसळला, 7 वर्षांच्या चिमुरड्याचा करूण अंत

कन्हैया दिनदयान दुबे (७) असं मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने दुबे कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

    रवी शिंदे, प्रतिनिधी भिवंडी, 04 जानेवारी :  भिवंडी तालुक्यात बंगल्याच्या प्रवेशद्वावर लावलेला लोखंडी स्लायडिंग गेट अंगावर पडून झालेल्या अपघातात एका सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. कन्हैया दिनदयान दुबे (७) असं मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने दुबे कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. मौजे पुर्णा येथील प्रफुल्ल खंडागळे यांचा आनंद व्हिला हा बंगला असून या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर भलामोठा लोखंडी गेट लावण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास या बंगल्याच्या लोखंडी स्लायडिंग गेटवर चढून शेजारची मुले खेळत होती. त्यावेळी गेटवर चढून मुलांनी गेट जोरजोरात हलवला. त्यामुळे गेट जमिनीवर पडला. त्यामध्ये तीन ते चार मुले सापडली होती मात्र, कन्हैया दुबे याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यास जखमी अवस्थेत काल्हेर येथील एस.एस.हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची नारपोली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे दुबे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.  त्यामुळे त्यांचे जाबजबाब नोंदविल्यानंतरच या मृत्यूस कोण जबाबदार आहे हे तपासून त्याच्याविरोधात योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, बंगल्याचे मालक प्रफुल्ल खंडागळे यांनी याबद्दल खुलासा केला आहे. नवं वर्षाच्या स्वागतासाठी कुटुंबीयांस ते जम्मू काश्मीर इथं गेले. हे कुटुंब ५ जानेवारी रोजी घरी परतणार आहे. घराच्या शेजारी असणारी मुलं नेहमी परिसरात खेळत असतात. या मुलांसह खंडागळे यांचा मुलगाही खेळत असतो. मात्र, घरी आई एकटी असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेशी आमचा काही संबंध नाही, असा दावाही त्यांनी केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या