माझी हत्या करा आणि तुम्हाला फाशी होईल- इच्छामरण मागणाऱ्या इरावती लवाटेंचं पतीला पत्र

माझी हत्या करा आणि तुम्हाला फाशी होईल- इच्छामरण मागणाऱ्या इरावती लवाटेंचं पतीला पत्र

नारायण लवाटे हे 86 वर्षांचे तर इरावती लवाटे या 79 वर्षांच्या आहेत. राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करून त्यावर काहीही उत्तर न आल्याने या दाम्पत्याने आता स्वतःच्या हत्येची योजना आखली आहे

  • Share this:

मुंबई,19 फेब्रुवारी: -    मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. नारायण लवाटे आणि इरावती लवाटे  हे दोघं आता इच्छामरण मिळालं नाही तर इरावती लवाटेंची नारायण लवाटे हत्या करतील आणि त्यानंतर लवाटे मृत्यूदंडाची शिक्षा भोगतील  आणि मरण पत्करतील  असं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

नारायण लवाटे हे  86 वर्षांचे तर इरावती लवाटे या 79 वर्षांच्या आहेत. राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करून त्यावर काहीही उत्तर न आल्याने या दाम्पत्याने आता स्वतःच्या हत्येची योजना आखली आहे. इरावती यांनी स्वतःच्या पतीला पत्र लिहून स्वतःला संपवण्याची मागणी केलीय. पत्नीला मारल्यानंतर पतीलाही मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल, असं त्यांचं मत आहे.

लवाटे चर्नीरोडजवळच्या ठाकुरद्वारमध्ये राहतं. या दाम्पत्याला मुलं-बाळं नाही आहेत. वयानुसार समाजासाठी आपला काहीही उपयोग नसून स्वतःचा सांभाळ करण्यासाठी आपण आता सक्षम नाही, असं या दाम्पत्याला वाटतंय  अरूणा शानबाग यांना इच्छामरण मिळावं, यासाठी केईएम हॉस्पिटलने दया याचिका दाखल केली होती  ते वाचूनच या दाम्पत्याने इच्छामरणाची याचिका दाखल केली.

 21 डिसेंबर रोजी या दाम्पत्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केल होती. 31 मार्च 2018पर्यंत उत्तराची वाट पाहू, असं या जोडप्याने पत्रात नमूद केलं होतं. पण पत्र पाठवून दोन महिने उलटत असून त्यांचं पत्र गांभीर्याने घेतलं नसल्यानं त्यांनी एकमेकांच्या हत्येची योजना आखली आहे.

लग्नाच्या पहिल्याच वर्षी लवाटे दाम्पत्याने मुलं जन्माला घालायची नाहीत, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना कुणीही वारस नाही. अनेक वर्षे सोबत सुखाने जगलो आता आम्हाला सोबत मृत्यू मिळावा म्हणून आम्ही इच्छा मरणाची मागणी केली आहे असं या दोघांनी म्हटलं. इच्छामरणाचा कायदा व्हावा म्हणून हे दाम्पत्य 30 वर्षे पाठपुरावा करतं आहे.

First published: February 19, 2018, 1:26 PM IST

ताज्या बातम्या