इक्बाल कासकरला सुरू करायचा होता गुटखा व्यवसाय

इक्बाल कासकरला सुरू करायचा होता गुटखा व्यवसाय

त्यासाठी गुटखा तयार करण्याचं युनिट लावण्याची तयारीही केली जात होती. मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात गुटखा युनिट लावण्यासाठी तो काही गुटखा व्यापाऱ्यांच्या संपर्कात होता. मुमताज आणि इसरालाही त्यानं यात सहभागी करुन घेतलं होतं. यासाठी इक्बालला मोठ्या रकमेची गरज होती

  • Share this:

ठाणे,11 ऑक्टोबर: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला गुटखा व्यवसाय सुरू करायचा होता अशी माहिती त्याने ठाणे पोलिसांना दिली आहे. यासंदर्भात ठाणे क्राईम ब्रँचने केलेल्या इक्बाल कासकरच्या चौकशीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

इक्बाल कासकर गुटखा व्यवसायात उतरण्याच्या तयारीत होता. त्यासाठी गुटखा तयार करण्याचं युनिट लावण्याची तयारीही केली जात होती. मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात गुटखा युनिट लावण्यासाठी तो काही गुटखा व्यापाऱ्यांच्या संपर्कात होता. मुमताज आणि इसरालाही त्यानं यात सहभागी करुन घेतलं होतं. यासाठी इक्बालला मोठ्या रकमेची गरज होती. गेले काही दिवस तो ही रक्कम जमवण्याचा प्रयत्न करत होता. या युनिटसाठी काही गुटखा व्यापारी इक्बालला मदत करत होते. त्यांची नावं ठाणे क्राईम ब्रँचला मिळाली आहेत. लवकरच त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरून इक्बाल हा गुटख्याचा व्यवसाय सुरु करणार होता. इथं तयार होणारा गुटखा भारताबरोबरच युएईत पोहोचवून विकण्याचा अनिस आणि इक्बालचा प्लॅन होता. इक्बाल कासकरचा जवळचा नातेवाईक युएईमध्ये हा गुटखा वितरीत करणार असल्याचा प्लॅन होता. गुटख्याला पाकिस्तान आणि युएई मध्ये जास्त मागणी आहे. खंडणीच्या माध्यमातून मिळणारा पैसा इक्बालनं अनिस आणि दाऊदच्या म्हणण्यानुसार गोव्यातील प्रॉपर्टीमध्ये गुंतवल्याची माहिती चौकशीच्या दरम्यान समोर आली आहे. या संपत्तीच्या दस्तावेजांची चौकशी करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 01:06 PM IST

ताज्या बातम्या