विनामास्क Dance मस्ती; विश्वास नांगरे पाटलांनी शेअर केला 30 वर्षांपूर्वीचा PHOTO

विनामास्क Dance मस्ती; विश्वास नांगरे पाटलांनी शेअर केला 30 वर्षांपूर्वीचा PHOTO

कडस शिस्तीसाठी ओळखले जाणारे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक जुना फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल: रुबाबदार आणि डॅशिंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) हे तरुणांचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. कडक शिस्त आणि तडफदार अधिकारी असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी नुकताच आपल्या फेसबूक अकाऊंटवर (Facebook account) एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो विश्वास नांगरे पाटील महाविद्यालयात (College days) असतानाचा आहे. हा फोटो शेअर करत नांगरे पाटील यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा (share old memories) दिला आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कॉलेजच्या दिवसांतील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विश्वास नांगरे पाटील आपल्या इतर मित्रांसोबत डान्स करताना दिसत आहेत. हा फोटो 30 वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी कोरोना सारखं कुठलंही संकट नव्हतं आणि म्हणूनच कॉलेजच्या दिवसांत विनामास्क डान्स करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे, "College days! Dance without mask! 30 years back".

विश्वास नांगरे पाटील यांनी शेअर केलेल्या या पोस्टला अवघ्या काही मिनिटांतच हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. त्यासोबतच अनेक कमेंट्स सुद्धा आल्या आहेत आणि विश्वास नांगरे पाटील यांची ही पोस्टही युजर्सकडून शेअर करण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरापासून सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यास सांगण्यात येत आहे. मात्र, 30 वर्षांपूर्वी असं काहीही नव्हतं आणि त्यामुळे सर्वचजण मोकळेपणाने मजामस्ती करत असत असं विश्वास नांगरे पाटील हे जुना फोटो शेअर करत सांगत आहेत.

VIDEO : 'तुम्ही सीपी असाल पण आम्ही इथले एसीपी आहोत', नांगरे-पाटलांना असे मिळाले आदेश

विश्वास नांगरे पाटील यांचा अल्प परिचय

विश्वास नांगरे पाटील हे सध्या मुंबईत सह पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

1999 मध्ये विश्वास नांगरे पाटील हे आयपीएस बनले.

विश्वास नांगरे पाटील यांचा विवाह 2000 साली झाला.

26/11 रोजी मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये नांगरे पाटील हे आपल्या पिस्तूलसह दहशतवाद्यांचा सामना करताना दिसून आले होते.

2007 साली पुण्यात रेव्ह पार्टीचा पर्दाफाश त्यांनी करत कारवाई केली होती. या कारवाईमुळेही ते चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले होते

2013 साली त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अहमदनगर, पुणे, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक अशा विविध ठिकाणी त्यांनी पोलीस पदाचे आपले कर्तव्य निभावले आहे.

First published: April 16, 2021, 9:42 PM IST

ताज्या बातम्या