मुंबई, 25 डिसेंबर: मुंबईत (mumbai) बस किंवा लोकलमधून (Local train) प्रवास करताना पर्स, मोबाइल आणि सोनसाखळ्या चोरीच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. भुरटे चोर गर्दीचा फायदा घेत हातोहात किमती ऐवज लंपास करतात. अशात मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. बेस्ट बसमधून प्रवास करत असताना एका आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स चोरीला (IPS officer's wife purse theft ) गेली आहे. गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरानं डाव साधला आहे. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
फिर्यादी महिला या मलबार हिल परिसरातील रहिवासी आहेत. त्यांचे पती सध्या महाराष्ट्र पोलिसांत उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी महिला बुधवारी सकाळी पावणे बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान चकाला येथून बेस्टच्या बसने घरी जात होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स चोरली आहे. बसमधून खाली उतरल्यानंतर त्यांची पर्स चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे.
हेही वाचा-माजी आमदाराच्या ड्रायव्हरला लुटलं; डोळ्यात मिरची पूड टाकून लाखो रुपये लंपास
या प्रकारानंतर, फिर्यादी महिलेनं बस डेपोत धाव घेतली, याठिकाणी त्यांनी एका अधिकाऱ्याला घडलेला प्रकार सांगितला. संबंधित अधिकाऱ्याने बसच्या वाहकाला फोन करून बसमध्ये पर्स विसरून राहिली का? याबाबत विचारणा केली. पण बसमध्ये पर्स नव्हती. बसमध्ये तिकीट काढण्यासाठी पर्स बाहेर काढल्यानंतर अज्ञात चोरट्यानं ही पर्स लांबवली असल्याची तक्रार अंधेरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
हेही वाचा-गरोदर पत्नीसोबत पतीचं राक्षसी कृत्य; दोन जीवांच्या महिलेनं जन्माआधीच गमावलं बाळ
पोलिसांनी आयपीसीच्या कलम 379 नुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून संबंधित बस मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही सापडतंय का ? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai