Home /News /mumbai /

आम्ही अस्वस्थ आहोत, राज्य सरकारलाही काही अधिकार आहेत; बैठकीनंतर शरद पवारांचं वक्तव्य

आम्ही अस्वस्थ आहोत, राज्य सरकारलाही काही अधिकार आहेत; बैठकीनंतर शरद पवारांचं वक्तव्य

'माझी मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बैठक झाली नाही. या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढला ही राज्य सरकारची इच्छा आहे.'

    मुंबई 10 सप्टेंबर: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी गुरूवारी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली आणि पुढच्या कामाची दिशाही ठरविण्यात आली. बैठकीनंतर शरद पवार म्हणाले, आम्ही अस्वस्थ आहोत गेले अनेक दिवस नक्षलवादाच्या नावाखाली अटक केली जात आहे हे योग्य नाही. पवार पुढे म्हणाले, आम्ही या प्रकणाचा आढावा घेतला. या प्रकरणाची  चौकशी NIA करते पण या सरकारला पण काही अधिकार आहेत. त्याअनुषंगाने काय करता येईल याबाबत तज्ज्ञांची मतं घेत आहोत. भीमा कोरेगावचा तपास आम्हाला वाटतं योग्य दिशेने सुरू नाही. त्यामुळे त्याचा विचार झाला पाहिजे. मराठा आरक्षण माझी मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बैठक झाली नाही. या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढला ही राज्य सरकारची इच्छा आहे. कंगना बिल्डिंग प्रकरण माझी पण इच्छा आहे... माझ्या नावावर अशी कोणी बिल्डिंग करावी. अर्थात जे कोणी बोलत आहे त्या व्यक्तीकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा धरावी का..? हा प्रश्न आहे.' शिवसेनेची नवी भूमिका दरम्यान कंगना प्रकरणावर आज शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची बैठक झाली त्यानंतर राऊतांनी भूमिका जाहीर केली. ‘महाराष्ट्रासारखं बिहारमध्ये पाडापाडीचं राजकारण करू नका’, खडसेंचा निशाणा कंगना रणौत प्रकरणावर राज्यात वादळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पक्षाची पुढची दिशा आणि रणनीती काय राहिल हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत पक्षासंदर्भात चर्चा झाली. सोनिया, पवार नाराज असल्याची अफवा पसरवू नका, असं काहीही नाही. कंगना हा विषय आमच्यासाठी संपला आहे, आम्ही ते विसरून गेलोय. आम्ही आमच्या नेहमीच्या सामाजिक, राजकीय कामाला लागलोय. ती काय ट्विट करतंय ते वाचले नाही, आम्ही फक्त सामना वाचतो. असंही त्यांनी स्पष्ट केलं. 'या' मुद्द्यांमुळे मुंबईच्या महापौर अडकणार? भाजपची अविश्वास प्रस्तावाची तयारी यावरून पवारांनी बुधवारी दिलेला सल्ला शिवसेनेने मनावर घेतला असं बोललं जात आहे. या प्रकरणाला जास्त महत्त्व देऊ नये असं पवारांनी म्हटलं होतं. कंगना  शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. दरम्यान बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर केलेली कारवाई सुडबुद्धीतून केल्याचा आरोप देखील शिवसेनेवर करण्यात आला. बीएमसीने बुधवारी केलेल्या कारवाईनंतर देखील काही ट्वीट कंगनाने केले होते.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sharad pawar

    पुढील बातम्या