मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला

मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला

आषाढ महिन्यासारखा पाऊस सध्या मुंबईत कोसळतोय. मध्य रेल्वे ५ ते १० मिनिटं उशिरानं धावतेय. तर विमान वाहतूक ४० मिनिटं उशिरानं सुरू आहे. ठिकठिकाणी पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. कांजुरमार्ग, चेंबूर, सायन, माटुंगा, दादर, परळ, वांद्रे या ठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर:  मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय. मुंबईच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय.

आषाढ महिन्यासारखा पाऊस सध्या मुंबईत कोसळतोय. मध्य रेल्वे ५ ते १० मिनिटं उशिरानं धावतेय.  तर विमान वाहतूक ४० मिनिटं उशिरानं सुरू आहे. ठिकठिकाणी पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.  कांजुरमार्ग, चेंबूर, सायन, माटुंगा, दादर, परळ, वांद्रे या ठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुपारी साडे बारा वाजता समुद्राला भरती येणार आहे. ४.३५ मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. ओखी चक्रीवादळ कालपासून गुजरातच्या दिशेनं सरकतंय. आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमाराला ते दक्षिण गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे.

मुंबईच्या समुद्रात आज दुपारी 12.30 वाजता उधाणाची भरती येणार आहे.  समुद्रात 4.35 मीटर्स उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

ओखी वादळाचा मुंबईच्या हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विमानतळावरील विमानांची ये-जा 40 मिनिटं उशिरानं होते आहे. 'ओखी चक्रीवादळ सूरत पासून ४८० किलोमीटर अंतरावर आहे. ते आज संध्याकाळ ५:३० पर्यंत दक्षिण गुजरातच्या समुद्र किनार्यांवर पोहचेल.' असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2017 12:02 PM IST

ताज्या बातम्या