• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र; मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र; मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार

येत्या तीन-चार दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

येत्या तीन-चार दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Weather Forecast: मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसगारात (bay of bengal) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:
    मुंबई, 12 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसगारात (bay of bengal) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झालं आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी (heavy rainfall in maharashtra) लागली आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस कोसळल्यानंतर आता याठिकाणी पावसानं उघडीप घेतली आहे. पण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाट परिसरात पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात कायम आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 48 तासात बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात येत्या तीन चार दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांचा याचा सर्वाधिक धोका असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोकणात आणि किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा-कोरोनातून बरं झालेल्यांच्या किडनीवर होतायेत गंभीर परिणाम? संशोधनातून माहिती समोर शनिवारी मुंबईत दिवसभर संततधार होती. तर तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यानंतर आता  सोमवार आणि मंगळवारी पालघर आणि ठाणे परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहेत. तर आज रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-बाप्पा पावला! 8 जिल्ह्यांत एकही कोरोना रुग्ण नाही; राज्याचा आकडाही दिलासादायक शनिवारी सांताक्रूझ येथे सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान 11.4 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. तर कुलाबा येथे 7.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये काही ठिकाणी तसेच ठाणे, मुलुंड, कुर्ला, बेलापूर, जुईनगर, वाशी अशा तुरळक ठिकाणी दिवसभरात 30 मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही मागील चोवीस तासांत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published: