Home /News /mumbai /

आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार किरीट सोमय्या, होणार सलग 4 दिवस चौकशी

आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार किरीट सोमय्या, होणार सलग 4 दिवस चौकशी

INS Vikrant Case Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी अपहार प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर होणार आहेत.

    मुंबई, 18 एप्रिल: आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी अपहार प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर होणार आहेत. या प्रकरणी त्यांची सलग चार दिवस चौकशी होणार असल्याचं समजतंय. तसंच मुंबई मनपा कोरोना (Mumbai Municipal Corporation Corona case) केस संदर्भात किरीट सोमय्या आझाद मैदान पोलीस स्टेशनला ही जाणार आहेत. किरीट सोमय्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावले होते. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्यांविरोधात पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलं गेलं. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेनं किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र निल सोमय्या या दोघांना चौकशीसाठी नोटीस पाठवली. सोमय्यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी अपहार प्रकरणात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली. किरीट सोमय्यांच्या या अर्जावर 13 एप्रिल रोजी हायकोर्टात सुनावणी झाली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अर्जावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने एक मोठा दिलासा त्यांना दिला आहे. सुनावणीपर्यंत अटक करु नये असं कोर्टाने म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. किरीट सोमय्या, निल सोमय्या आणि त्यांचे इतर साथीदार याविरुद्ध अर्ज केला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी, करोडोंचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. 2013 मध्ये खासदार असताना निधी गोळा केल्याचा आरोप सोमय्यांवर करण्यात आळा आहे. किरीट सोमय्या यांनी राष्ट्राची आणि जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे किरीट आणि निल सोमय्या या पितापूत्रांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी बबन भोसले यांनी केली आहे. नाशकात भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत 5 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, 7 जखमी भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा 60 कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. 1961 मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 60 कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Kirit Somaiya, Shivsena

    पुढील बातम्या