मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आता ‘नाणार’साठी जमिन खरेदीच्या चौकशीचे आदेश, गैरव्यवहार झाल्याचा आरोप

आता ‘नाणार’साठी जमिन खरेदीच्या चौकशीचे आदेश, गैरव्यवहार झाल्याचा आरोप

नाणार प्रकल्प घोषित झाल्यानंतर 2200 एकर जमिन खरेदी करण्यात आली होती. आणि अध्यदेश निघाल्यानंतर 800 एकर जमीन खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुंबई 15 ऑक्टोबर: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. आरेचं मेट्रो कार शेड रद्द करणे, जलयुक्त शिवारची चौकशी आणि आता नाणार प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित करतांना गैरव्यवहार झाला का याची चौकशी होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती याची चौकशी करेल आणि एक महिन्याच्या आत अहवाल देईल असंही आदेशात म्हटलं आहे. मुंबईत नाणार संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे गुरूवारी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. नाणारसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोकांनी जमिनी खरेदी करून घोटाळा केल्याचा आरोप स्थानिक संघटनांनी केला होता. नाणार प्रकल्प घोषित झाल्यानंतर 2200 एकर जमिन खरेदी करण्यात आली होती. आणि अध्यदेश निघाल्यानंतर 800 एकर जमीन खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. जर नानार रद्द झालं आहे तर या जमिनीचा घोटाळा उघड केला पाहिजे असं या संघटनांचं मत होतं. ही समिती मुख्यमंत्री आणि अध्यक्षांना एक महिन्याच्या आत अहवाल सादर करतील अशी माहिती अशोक वालम यांनी दिली. कोरोना महामारीत खोट्या माहितीचा महापूर; सावधान ! असे पसरतात गैरसमज शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारचा प्रकल्प रद्द करून तो रायगडला हलविण्यात येण्याची घोषणा केली होती. स्थानिक लोकांचाही या प्रकल्पाला प्रचंड विरोध होता. तर काही संघटनांनी त्याचं समर्थन केलं होतं. या प्रकल्पामुळे कोकणात गुंतवणूक येऊन रोजगार निर्मिती होईल असा त्यांचा दावा होता. ठाकरे सरकारच्या महिला मंत्र्यांना दणका! पोलिसावर हात उगारल्याबद्दल शिक्षा मात्र पर्यावरण, जमिन आणि प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित करत विरोध असल्याने हा प्रकल्प हलविण्याचा आदेश काढण्यात आला होता. या प्रकल्पाच्या विरोधात जे आंदोलन झालं होतं त्यात सहभागी आंदोलनकर्त्यांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात येतील असं सरकारने याआधीच घोषीत केलं आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या