मुंबईतील एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहारांची होणार चौकशी

मुंबईमधल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये गैरव्यवहार आणि नियमबाह्य कामं झालेल्या प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं आता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2017 10:14 PM IST

मुंबईतील एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहारांची होणार चौकशी

21 जुलै : मुंबईमधल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये गैरव्यवहार आणि नियमबाह्य कामं झालेल्या प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं आता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.

SRA मध्ये गेल्या वर्षभरात अनेक प्रकल्प नियमबाह्यरित्या मंजूर करण्यात आलेत. याशिवाय अनेक प्रकरणांमध्ये बांधकाम व्यावसायिकांना गैरमार्गाने फायदा मिळवून दिल्याचाही आरोप होतोय. या सर्व प्रकरणांची ही समिती चौकशी करणार आहे. SRA चे तत्कालीन सीईओ विश्वास पाटील यांना नगर विकास विभागाने आता कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

या नोटीसीला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, त्यांच्या कार्यकालातील तसंच इतर संशयास्पद प्रकरणांची चौकशी ही समिती करेल आणि आपला अहवाल राज्यसरकारला देईल. सरकार त्यानंतर पुढची कारवाई करेल.

दरम्यान, मुंबईत कायम संक्रमण शिबीरासंदर्भात अधिकारी आणि बिल्डरांनी मिळून केलेला घोटाळा समोर आला आहे. याप्रकरणात सरकारच्या आदेशानंतर गुन्हे दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: SRA scam
First Published: Jul 21, 2017 10:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...