S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'नेवाळीच्या आंदोलनकर्त्यांना कोठडीत अमानुष मारहाण'

ही अमानवी वागणूक न थांबल्यास उद्यापासून ठाण्याला पोलीस आयुक्तालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला.

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2017 10:50 PM IST

'नेवाळीच्या आंदोलनकर्त्यांना कोठडीत अमानुष मारहाण'

06 जुलै : नेवाळीतील आंदोलकांनी पोलिसांच्या शब्दावर आत्मसमर्पण केलं, मात्र सध्या या आंदोलकांवर पोलीस कोठडीत अनन्वित अत्याचार केले जात असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. डोंबिवलीत झालेल्या आगरी कुणबी समाजाच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

नेवाळी इथं नौदलानं सुरू केलेल्या १६७६ एकर जमिनीच्या अधिग्रहणाविरोधात २२ जून रोजी स्थानिक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. यात पोलिसांना मारहाण आणि पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. तर प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनीही पॅलेट गनचा वापर केला होता. या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ५६ जणांना अटक केलीये. या सर्वांना अमानुष मारहाण केली जात असून डब्बा देणं तसंच घरच्यांना भेटू देण्यासही पोलीस विरोध करतायत, असे आरोप यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी केले.

तसंच ही अमानवी वागणूक न थांबल्यास उद्यापासून ठाण्याला पोलीस आयुक्तालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला. पोलिसांचा स्वाभिमान दुखावल्यानं ते ही मारहाण करतायत, मग पैसे घेताना हा स्वाभिमान कुठे जातो? असा सवाल करत यावेळी गायकवाड यांनी पोलिसांवर हल्ला चढवला.दुसरीकडे पोलिसांच्या या अत्याचारामुळे आमची सहनशक्ती संपत चालली असून पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी वर्दी सोडून समोर यावं, आगरी समाज तुमची काय अवस्था करतो ते पाहा, असं म्हणत आगरी नेते संजय चिकनकर यांनी पोलिसांना थेट आव्हान दिलं. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 10:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close