• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • सावधान, कोलंबीला दिलं जातंय इंजक्शन!

सावधान, कोलंबीला दिलं जातंय इंजक्शन!

या व्हिडिओत दिसणाऱ्या महिला कोलंब्या मोठ्या आणि भरगच्च दिसण्यासाठी त्यांना इंजेक्शन लावतात आणि त्याच कोलंब्या आपण भक्कम पैसे देऊन विकत घेतो.

  • Share this:
मुंबई, 28 मे : अन्नपदार्थांमधली भेसळ आता आपल्यासाठी काही नवीन नाहीये. त्यामुळे फळभाज्या आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होतानाचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. पण ही बातमी मांसाहारी खाणाऱ्यांसाठी जरा महत्त्वाची आहे. तुम्ही कोलंबी खातच असाल. तर हा व्हिडिओ जरा नीट बघा. या व्हिडिओत दिसणाऱ्या महिला कोलंब्या मोठ्या आणि भरगच्च दिसण्यासाठी त्यांना इंजेक्शन लावतात आणि त्याच कोलंब्या आपण भक्कम पैसे देऊन विकत घेतो. आता या इंजेक्शनमध्ये काय मिक्स केलं आहे आणि त्याचा आपल्या आरोग्याला काय धोका होणार आहे त्याचा काही अंदाज नाही.  त्यामुळे पैशापायी आपल्या जीवाशी कसा खेळ चालू आहे हे तुम्ही पाहू शकता. त्यामुळे बाहेरून कोणतेही पदार्थ विकत घेताना  सतर्कता ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण प्रश्न आरोग्याचा आहे.
First published: