Home /News /mumbai /

jayant patil health update : हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर खुद्द जयंत पाटलांनी दिली माहिती

jayant patil health update : हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर खुद्द जयंत पाटलांनी दिली माहिती

बैठक सुरू असताना मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील हे बाहेर पडले.

  मुंबई, 28 जुलै : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांना तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital mumbai )  दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. 'आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही.' अशी माहिती खुद्द जयंत पाटील यांनी ट्वीट करून दिली. जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर ट्वीट करून जयंत पाटील यांनी आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. 'आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल' असं जयंत पाटील म्हणाले. राज्यात आलेल्या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत जयंत पाटील यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते या बैठकीतून बाहेर पडले. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. City Of Dreams2 साठी प्रिया बापट सज्ज! पहिल्या सीझनच्या लेस्बियन किसनंतर नव्या.. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे बाजूलाच असलेल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांची ईसीजे करण्यात आला आहे. ह्रदयाची काय परिस्थिती आहे, त्यानुसार, तपासणी केली जाणार आहे. जर गरज पडल्यास सकाळी अँजिओप्लास्टी सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. बैठक सुरू असताना मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील हे बाहेर पडले. त्यांच्यासोबत इतर 4 मंत्री सुद्धा बाहेर पडले आहे. जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे ते आता ब्रीच कॅडी हॉस्पिटलकडे निघाले आहे.

  काळजाचा ठोका चुकवेल हा VIDEO! दूधसागर रोरावत ट्रेनवर कोसळला, निम्मी ट्रेन गायब

  सध्या जयंत पाटील ब्रीच कॅन्डी हॅास्पिटलमध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या आज वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येणार आहे. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. त्यांच्यावर आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये काही चाचण्या करण्यात येणार आहे, अशी अधिकृत माहिती जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Jayant patil

  पुढील बातम्या