S M L

अमिताभ बच्चनची डॉक्युमेंट्री पाहून या 'हिरो'ने 4 वर्षाच्या मुलीला बलात्कारापासून वाचवलं

सरवीनने आवाजाचा दिशेने धाव घेतली तेव्हा त्याच्या दिसलं की 4 वर्षांची लहान मुलगी रडत आहे. त्या मुलीच्या अंगावर कपडेही नव्हते. ती मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत तिथं पडली होती आणि तिच्या शेजारी एक तरुण उभा होता.

News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2018 06:25 PM IST

अमिताभ बच्चनची डॉक्युमेंट्री पाहून या 'हिरो'ने 4 वर्षाच्या मुलीला बलात्कारापासून वाचवलं

विनय दुबे, मुंबई, 6 डिसेंबर : सिनेमाचा आणि त्यातील कलाकारांचा अनेकांवर मोठा परिणाम होतो. कधी याचा फायदा होतो तर कधी तोटा. आता एका व्यक्तीने अमिताभच्या डॉक्युमेंट्रीमुळे 4 वर्षाच्या मुलीला बलात्कारापासून वाचवल्याची मुंबईतील एक घटना आता समोर आली आहे.

सरवीन सिंग या मुंबईतील मुलुंडमध्ये राहणारा व्यक्त आपल्या मित्रासोबत घरी चालला होता. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडूपातून त्याला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. सरवीनने आवाजाचा दिशेने धाव घेतली तेव्हा त्याच्या दिसलं की एक लहान मुलगी रडत आहे. त्या मुलीच्या अंगावर कपडेही नव्हते. ती मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत तिथं पडली होती आणि तिच्या शेजारी एक तरुण उभा होता.

हरवीन सिंग तिथं पोहचल्यावर त्याने मुलीशेजारी उभ्या असणाऱ्या त्या तरुणाला याबाबत विचारलं. तेव्हा तो आरोपी तरुण म्हणाला ही माझी मुलगी आहे. मी तिला बाथरूमला घेऊन आलोय. पण सरवीनच्या आरोपीची ही चलाखी सरवीनच्या लक्षात आली. कारण त्या 4 वर्षांच्या मुलीच्या नाकातून रक्त येत होतं. तसंच तिच्या अंगावर कपडेही नव्हते.


सरवीन सिंगच्या लक्षात आलं की, हा जर मुलीचा बाप असता तर त्याने लहान मुलीला झुडपामध्ये बाथरूमसाठी आणलं नसतं तसंच तिच्या नाकातून रक्त येत असल्याने तो आधी तिला रुग्णालयात घेऊन गेला असता. अत्याचार करण्यासाठीच  या तरुणाने लहानगीला झुडुपात आणलं आहे, याची खात्री झाल्यानंतर सरवीनने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. सरवीनचा आवाज ऐकताच मग रस्त्यावरून जाणारे लोकही तिकडे आले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या  व्हिडिओमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईकरांना जागरुक  करण्यासाठी एका पोलिसाची भूमिका केली होती.

मी अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता आहे आणि त्यांनी नुकताच केलेल्या व्हिडिओने मी प्रभावित झालो होतो, असं या 4 वर्षांच्या लहानगीला बलात्कारापासून वाचवणाऱ्या सरवीन सिंगने म्हटलं आहे.

Loading...

आणखी बातम्या:

बाबरी पाडणाऱ्या या कारसेवकाला आज धर्माचीच गरज वाटत नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2018 06:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close