BREAKING: आज पहाटे ठाणे हादरलं, कचऱ्यात सापडले नवजात अर्भक

BREAKING: आज पहाटे ठाणे हादरलं, कचऱ्यात सापडले नवजात अर्भक

ही बातमी वाऱ्यासारखी ठाण्यात पसरल्यानंतर नवजात अर्भकाला बघण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

  • Share this:

अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 10 डिसेंबर : ठाणे पूर्व येथील हरिश्चंद्र राऊत शाळेजवळील कचरा कुंडीत आज सकाळी एक नवजात अर्भक सापडलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांचे असलेले हे अर्भक मृतावस्थेत असून त्याची नाळदेखील तशीच असल्याचे दिसून आले. घटनेची खबर मिळताच कोपरी पोलीस घटनास्थळी पोचले आहेत.

कोपरी पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेतलं असून ते सिव्हिल रुग्णालयत पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, ही बातमी वाऱ्यासारखी ठाण्यात पसरल्यानंतर नवजात अर्भकाला बघण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांकडून झालेली गर्दी पांगवण्यात आली असून आता घटनेचा तपास सुरू आहे. हे बाळ कोणाचं आहे आणि असे कोण निर्दयी आई-बाबा आहे ज्यांनी पोटच्या गोळ्याला असं फेकून दिलं याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, घटनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस स्थानिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. तर हे अर्भक कचराकुंडीत कोणी फेकलं हे शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासणार आहेत. पण पोटच्या बाळाला अशा प्रकारे फेकल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नाराजी परसरली आहे.

इतर बातम्या - धक्कादायक! शिर्डीमध्ये आईसह 3 मुलांना विषबाधा, चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

मागच्या महिन्यामध्ये आळंदीतील इंद्रायणी नदीच्या घाटावर नवजात अर्भक  सोडून जन्मदाते पसार झाल्याची मनसुन्न करणारी घटना उघडकीस आली होती. सोडलेलं अर्भक स्त्री जातीचं असल्याने माऊलीच्या दारात या चिमुकलीवर नकोशी होण्याची वेळ आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. खरंतर समाजात मोठ्या प्रमाणावर 'बेटी बचाव' असा नारा देत समाजप्रबोधन केलं जातं. पण त्याचा परिणाम किती लोकांना होतो हा मोठा प्रश्न आहे.

इतर बातम्या- मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर 2 गंभीर

ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शेकडो भाविक आळंदित दाखल झाल्याने नेमकं हे कृत्य कुणी केलं असेल याचा आळंदी पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, चिमुकलीची प्रकृती स्थिर असून तिला  जवळच्या शिशुविहारात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. गेल्या अनेक दिवसांमध्ये अशा धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: thane news
First Published: Dec 10, 2019 10:30 AM IST

ताज्या बातम्या