इंदुरीकर संतापले, कीर्तनाला रामराम करून धरणार शेतीची वाट?

इंदुरीकर संतापले, कीर्तनाला रामराम करून धरणार शेतीची वाट?

इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ 'मराठी कीर्तन व्हिडिओ' या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता.

  • Share this:

अहमदनगर, 15 फेब्रुवारी:  खुमासदार कीर्तनातून श्रोत्यांना प्रबोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार  इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडून शेती करेन, असं वक्तव्य केलं आहे. 'दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जावू शकतं. मी जे बोललो ते अनेक ग्रंथात नमूद आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला' असं त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

इंदुरीकर महाराजांना या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचा धनी व्हावं तर लागलंच पण त्याच बरोबर त्यांच्या अडचणीतही वाढ झाली. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर येथील वैद्यकीय विभागाकडून नोटीस काढण्यात आली आहे. पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या  पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे.

हेही वाचा-राज ठाकरे म्हणाले पक्षातच आहे गद्दार, 2 दिवसांत नावं समोर आणून करणार हकालपट्टी

या संपूर्ण प्रकरणाचा मला त्रास झाला असून मी एक दोन दिवस बघेन अन्यथा कीर्तन सोडून शेती करेन असं इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत. त्यामुळे आता खरंच इंदुरीकर महाराज शेतीकडे वळतात की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले ?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.' पीसीपीएनडिटी च्या सल्लागार समितीने प्रसारित व्हिडीओ, वृत्तपत्रातील बातम्या यावर आता हभप इंदोरीकर महाराजांना नोटीस पासून खुलासा मागवला आहे.

हेही वाचा-अडीच लाख तांदळाच्या दाण्यांवर रामनाम, नववीतील विद्यार्थ्यांचा विक्रम

First published: February 15, 2020, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading