मुंबई, 18 सप्टेंबर : मुंबईतील इंदू मिलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला होता. पण, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये धुसफूस आणि निमंत्रणावरून नाराजी नाट्यानंतर अखेर हा कार्यक्रमच अनिश्चित काळासाठी कार्यक्रम रद्द केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यास समोर बोलून दाखवली. इंदू मिल कार्यक्रम यावरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी होती. त्यामुळे इंदू मिल पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला? अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ नको म्हणून तुर्तास कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली.
शपथविधी असो वा विकास कामाची पाहणी, अजित पवारांच्या स्टाईलने सगळ्यांची उडते झोप!
दरम्यान, त्याआधी या कार्यक्रमाला मोजक्यात 16 जणांना बोलावण्यात आले होते. पण, इंदु मिलसाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर यानांही आमंत्रित करण्यात आले नव्हते. सरकारने बाबासाहेबांच्या कुटुंबातील सदस्यांनाच आमंत्रित न केल्यामुळे तीव्र नाराजी उमटली होती.
अखेर सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास एमएमआरडीएकडून एक पत्रक प्रसिद्ध करून आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले होते. निमंत्रण मिळाल्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी पायाभरणीच्या कार्यक्रमास जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
विवाहित तरुणीने पुन्हा केले लग्न,तिच्या त्रासाला कंटाळून तरुणाने स्वत:ला संपवले!
तरदुसरीकडे, विरोधी पक्षांनेत्यांनाही या कार्यक्रमाची माहिती आणि निमंत्रण देण्यात आली नव्हती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याची माहिती समोर आली. दोघेही नेते मुंबईत असून निमंत्रण देण्यात आले नव्हते. तर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.