मुंबईजवळ मोठा विमान अपघात टळला, दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटसमोर आला पक्षी आणि...

मुंबईजवळ मोठा विमान अपघात टळला, दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटसमोर आला पक्षी आणि...

विमानात बसलेले सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर इंडिओ मॅनेजमेंटने प्रवाश्यांसाठी दुसर्‍या विमानाची व्यवस्था केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : आज मुंबईजवळ एक मोठा विमान अपघात टळला. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला एक पक्षी येऊन आदळला, यानंतर त्यांना तातडीने मुंबई विमानतळावर विमान परत लॅण्ड करण्यात आले. विमानात बसलेले सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर इंडिओ मॅनेजमेंटने प्रवाश्यांसाठी दुसर्‍या विमानाची व्यवस्था केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी इंडिगोचे फ्लाइट 6E 5047 मुंबईहून दिल्लीकडे येत होते. यावेळी, अचानक विमानाच्या पुढच्या भागावर एक पक्षी आदळला. त्यामुळे विमान पुन्हा मुंबईत बोलविण्यात आले.

वाचा-केवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, अशी आहे ऑफर

वाचा-मारूती देत आहे 4 फेव्हरेट गाड्यांवर तब्बल 50 हजारांचा डिस्काउंट, जाणून घ्या एकदा

मुख्य म्हणजे सुदैवाने या अपघातात एकही प्रवासी जखमी झाला नाही. मात्र या अपघातामुळे विमान त्वरित पुन्हा मुंबई विमानतळावर लॅंण्ंड करावे लागले. जेव्हा विमान मुंबई विमानतळावर आणले गेले, तेव्हा इंडिगोच्या अधिकाऱ्यां सांगितले की त्यांनी तातडीने प्रवाश्यांसाठी दुसर्‍या विमानाची व्यवस्था केली आहे. मात्र पहिले विमान रद्द केल्यामुळे मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी विलंब झाला. मात्र प्रवाशांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी आणि क्रु मेंबर्सने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 27, 2020, 4:56 PM IST

ताज्या बातम्या