मुंबईची लाईफलाईन थांबणार! लोकल पूर्णपणे बंद करण्याचा मोदी सरकारनेच घेतला निर्णय

मुंबईची लाईफलाईन थांबणार! लोकल पूर्णपणे बंद करण्याचा मोदी सरकारनेच घेतला निर्णय

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशभरातील लोकल आणि रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. लोकल पूर्णपणे बंद न करता यामध्ये ओळखपत्र दाखवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कामगारांना प्रवेश दिला जाणार होता. मात्र आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशभरातील लोकल आणि रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलही आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण समोर आले आहे. मुबईत 6 तर पुण्यात 4 असे 10 नवीन रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण आहे. हे रुग्ण कोण आहेत आणि यांना कोरोनाची लागण कशी झाली याचा आता आरोग्य विभागाकडून तपास सुरू आहे. दरम्यान, आज कोरोनामुळे राज्यात आणखी एक मृत्यू झाला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असं असताना महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा दुसरा मृत्यू झाला. एका 56 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

दरम्यान, भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) वेगाने पसरतो आहे. काल फक्त 24 तासांत तब्बल 98 रुग्ण आढळले होते. आता यामध्ये आणखी रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 324वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 74 रुग्ण आहेत.

First published: March 22, 2020, 1:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या