शरद पवार आणि पंकजा मुंढे एकाच व्यासपीठावर... आजच्या 5 मोठ्या बातम्या

शरद पवार आणि पंकजा मुंढे एकाच व्यासपीठावर... आजच्या 5 मोठ्या बातम्या

  • Share this:

आता परळ टर्मिनल्स

मुंबईतील दादर स्टेशनंतर आता जलद गाड्यांना परळ इथं थांबा मिळणार आहे. परळ टर्मिनल्सचे रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

मुंबईची मोनो ट्रॅकवर

मुंबईकरांची बहुप्रतिक्षित मोनो रेल अखेर ट्रॅकवर आली आहे. चेंबूर ते जेकब सर्कल हा मोनोरेलचा दुसरा टप्पा आज प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संध्याकाळी 6 वाजता उद्घाटन होणार आहे.

भाजपची बाईक रॅली

भाजपच्या देशव्यापी बाईक रॅलीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री आणि सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. मुंबईतून या रॅलीला सुरुवात होणार आहे.

शरद पवार आणि पंकजा मुंढे एकाच व्यासपीठावर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. सकाळी ११ वाजता क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय डोंगरे विद्यार्थी वसतीगृह नाशिक येथील नवीन इमारतचे उद्घाटन होणार आहे.

कोकणात सेनेकडून सामूदायिक विवाह सोहळा

रत्नागिरी येथे शिवसेनेतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.

===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2019 07:01 AM IST

ताज्या बातम्या