मुंबई 23 मार्च : सर्व जग आणि भारत करोना व्हायरसविरुद्ध लढत असताना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी एक सल्ला दिलीय. सध्या पाकिस्तान अस्थिर आहे. घाबरलेला आहे. पाकिस्ताने बेकायदेशीरपणे काश्मीरचा जो प्रदेश ताब्यात घेतलाय तो प्रदेश ताब्यात घेण्याची हीच योग्य वेळ आहे असं त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोष्ट वर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. कोरोना व्हायरसशी सरकार आणि आपण सगळे लढतो आहोत. त्या विरुद्धची लढाई आपण जिंकू सुद्धा. मात्र चीन आणि पाकिस्तानची मैत्री ही कोरोनाइतकीच धोक्याची आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, जमावबंदीनंतरही राज्यातील रस्त्यांवर गर्दी सुरू होती. यामुळे राज्य सरकारने कठोर निर्णय घेत संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे अनावश्यपणे कोणालाही आता रस्त्यावर फिरता येणार नाही.
'राज्यात नाईलाज म्हणून संचारबंदी लागू करत आहोत. महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याचा निर्णय काल घेतला. आता जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक बंद करण्यात येत आहे,' अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांखेरीज कुठलीच वाहने रस्त्यावर येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.
‘कोरोना’विरुद्ध गावकरी सरसावले, या गावात नव्या व्यक्तिंना No Entry
एकीकडे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे, कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना राज्य सरकारने क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं आहे. कम्युनिटीमध्ये कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी परदेशातून भारतात आलेल्यांना पुढील किमान 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
लोक विचारतात, घरी बसून तुम्ही काय करता? शरद पवारांनी दिलं उत्तर
अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पुण्यात (Pune) परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं होतं. शिवाय त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे.
त्यातील काहीजण अचानक बेपत्ता झाले आहेत. पुणे पोलिसांनी यांना हजर राहण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.