Home /News /mumbai /

बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत येणार; राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी केल्यास पुढे काय होईल?

बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत येणार; राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी केल्यास पुढे काय होईल?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटीतील अपक्ष आमदार आता राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी करण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदार मुंबईसाठी गुरुवारी रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे

    गुवाहाटी 28 जून : राज्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप (Maharashtra Political Crisis) आलेला आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बंडखोर शिंदे गटासोबत मिळून भाजप राज्यात सरकार स्थापन करण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राज्यातील हा राजकीय संघर्ष सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला आहे. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. 'एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र', संजय राऊत अचानक नरमले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटीतील अपक्ष आमदार आता राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी करण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदार मुंबईसाठी गुरुवारी रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे, सभागृहात कोणत्याही क्षणी विश्वासदर्शक प्रस्ताव येण्याची शक्यता वाढली आहे. आज यासंदर्भात शिंदे गटाची गुवाहाटीमध्ये एक बैठकही होणार आहे. शिंदे गटातील आमदार राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी करू शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या जैसे थे आदेशाला डावलून राज्यपालांनी मविआ सरकारला फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिल्यास, राज्यपालांचं हे कृत्य घटनाबाह्य असेल, असं स्पष्ट मत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ प्रो. उल्हास बापट यांनी नोंदवलं आहे. तसंच राज्यपालांच्या या परस्पर आपात्कालीन अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयाला मविआ सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ शकतं, असंही बापट यांनी म्हटलं आहे. Shiv Sena Sada Sarvankar : मनोहर जोशींचं घर जाळण्याचे आदेश राऊतांनी दिले, बंडखोर सदा सरवणकर यांचा गौप्यस्फोट video 11 जुलैच्या आधी राज्यपाल ठाकरे सरकार पाडू शकत नाहीत. 11 जुलैच्या आधी राज्यपालांकडून फ्लोअर टेस्टसाठी अधिवेशन बोलावलं गेल्यास महाविकास आघाडी सरकार त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ शकतं. त्यामुळे आषाढी एकादशीची महापुजा ठाकरेच करणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या