विदर्भातले 'हे' फायरब्रॅण्ड अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात

अतिशय आक्रमक आणि अभिनव आंदोलनाने त्यांनी अनेकदा सरकारचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी शिवबंधन बांधलं तर त्याचा शिवसेनेला विदर्भात मोठा फायदा होऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 05:29 PM IST

विदर्भातले 'हे' फायरब्रॅण्ड अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात

उदय जाधव, मुंबई 22 सप्टेंबर : आपल्या लक्षवेधी आंदोलनांनी राज्यभर विख्यात असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. बच्चू कडू हे विदर्भातल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ते शिवबंधन बांधतील अशी माहिती आहे. बच्चू कडू यांनी रविवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे या चर्चेने जोर पकडलाय. बच्चू कडू यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावलीय. ते म्हणाले, माझा सध्या कोणत्याही पक्षात प्रवेशाचा विचार नाही. मी फक्त माझ्या प्रहार या संघटनेच्या कामा संदर्भात उद्धव ठाकरेंशी  चर्चा केली असल्याचं बच्चू कडू यांनी खुलासा केलाय. बच्चू कडू यांची युवावर्गात लोकप्रियता असून त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. अतिशय आक्रमक आणि अभिनव आंदोलनाने त्यांनी अनेकदा सरकारचं लक्ष वेधून घेतलं होतं. अपंगांसाठी त्यांनी थेट दिल्लीपर्यंत आंदोलनं केली आहेत. त्यांनी शिवबंधन बांधलं तर त्याचा शिवसेनेला विदर्भात मोठा फायदा होऊ शकतो.

पुण्यात कुणाला किती जागा? अजित पवारांनी जाहीर केलं जागावाटपाचं सूत्र

काँग्रेस-राष्ट्रवादीमधून 'गळती' सुरूच

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. मात्र पक्षांतराचा तयारीत असलेले आघाडीत काही आमदार मात्र अजूनही वेटिंगवरच आहेत. त्यातच आता निवडणुकांचीही घोषणा झाली असल्याने या आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.

सोलापूर जिल्हा हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखला जात होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत युतीने या गडाला सुरुंग लावला. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या करमाळ्यातील रश्मी बागल यांनीही हाती शिवबंधन बांधलं.

Loading...

बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांचं अनोखं आंदोलन, रामकुंडावर केलं पिंडदान!

दुसरीकडे, माढ्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि सिद्धराम म्हेत्रे हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र वाटाघाटी पूर्ण न झाल्याने या आमदारांचा भाजप प्रवेश अद्याप होऊ शकलेला नाही. अशातच आता निवडणुकाही जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे नक्की कुणाकडून लढायचं याबाबत या आमदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2019 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...