जीएसटीने केली स्वस्ताई, राज्य सरकारने केली 'महागाई'

जीएसटीने केली स्वस्ताई, राज्य सरकारने केली 'महागाई'

"वाहन नोंदणीसाठी घेतल्या जाणाऱ्या एकरकमी मोटार वाहन करात वाढ करण्यात आली आहे"

  • Share this:

03 जून : जीएसटी लागू झाल्यानंतर छोट्या गाड्या स्वस्त होणार अशी चिन्ह होती. मात्र, आता ग्राहकांच्या आशेवर राज्य सरकारने पाणी फेरलंय. वाहन नोंदणीवरचा कर वाढवण्यात आलाय.

जीएसटी लागू झाल्यामुळे चारचाकी वाहनांच्या किंमती 3 टक्क्याने कमी झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच कार कंपन्यांनी आपल्या प्रत्येक माॅडेल्सचे दर कमी केले आहे. त्यापाठोपाठ दुचाकीच्या किंमतीतही 2 टक्क्यांनी कमी झाले आहे.

मात्र,दुसरीकडे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने वाहन नोंदणीसाठी घेतल्या जाणाऱ्या एकरकमी मोटार वाहन करात वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम-1958 मधील तरतुदीनुसार वाहनांच्या नोंदणीवेळी एकरकमी मोटार वाहन कर आकारण्यात येतो. यापूर्वी, दुचाकी आणि तीनचाकीवरील कराचे प्रमाण 8 ते 10 टक्के या दरम्यान होते. त्यामध्ये वाढ होऊन 10 ते 12 टक्के कर लागू होणार आहे. पेट्रोल इंधन आधारित मोटार कारवरील कर 9 ते 11 टक्के या दरम्यान होता, तर आता 11 ते 13 टक्के कर लावण्यात येणार आहे.

डिझेल इंधन आधारित मोटार कारवरील कर 11 टक्के ते 13 टक्के या दरम्यान होता. त्यावर आता 13 ते 15 टक्के याप्रमाणे कर लावण्यात येणार आहे. सी.एन.जी. अथवा एल.पी.जी. इंधन आधारित मोटार कारवरील कर 5 ते 7 टक्के या दरम्यान होता, त्यामध्ये वाढ होऊन 7 ते 9 टक्के कर लावण्यात येणार आहे.

तसंच सर्वच वाहनांसाठी मोटार वाहन कराची उच्चतम कर मर्यादा 20 लाख रुपये एवढी ठेवण्यात येणार आहे.

Loading...

गाड्यांच्या नोंदणी करात वाढ

     

दुचाकी-तीनचाकी कर 8 ते 10 टक्क्यांवरून 10 ते 12 टक्के

पेट्रोल करावरील कर 9 ते 11 टक्क्यावरून 11 ते 13 टक्के

डिझेल करावरील कर 11 ते 13 टक्क्यावरुन 13 ते 15 टक्के

सीएनजी, एलपीजी आणि करावरील कर 5 ते 7 टक्क्यावरुन 7 ते 9 टक्के

इम्पोर्टेड गाड्यांवर कराची कमाल मर्यादा 20 लाख रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 09:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...