योद्धाच सापडले 'कोरोना'च्या विळख्यात, पॉझिटिव्ह पोलिसांच्या संख्येत मोठी वाढ

योद्धाच सापडले 'कोरोना'च्या विळख्यात, पॉझिटिव्ह पोलिसांच्या संख्येत मोठी वाढ

कोरोनापासून नागरिकांना वाचवण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. मात्र, कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्धांनाच संसर्गाने विळखा घातला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 मे: मुंबईसह राज्यात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनापासून नागरिकांना वाचवण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. मात्र, कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्धांनाच संसर्गाने विळखा घातला आहे.

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात 227 पोलिसांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यात 30 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित 65 टक्के पोलिस एकट्या मुंबईत आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 46झाली आहे.

हेही वाचा...आता करता येणार राज्यातल्या राज्यात प्रवास, सरकारची नवी नियमावली

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. जुहू पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वांद्रे येथील पोलिसांची वसाहत सीव करण्यात आली आहे. रफी किडावाई मार्ग वसाहतीतील एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे भायखळा येथे देखील एका पोलिसासा कोरोनाची बाधा झाल्याने भायखळा पोलिस वसाहतीतील इमारत सील करण्यात आली आहे. मुंबईत एकूण 6 पोलिस वसाहती सील करण्यात आल्या आहे.

औरंगाबादेत पोलिस स्टेशनच केलं प्रतिबंधित

औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलिस स्टेशनमधील सर्व पोलिसांनी नशेच्या गोळ्या विकणाऱ्या एका आरोपीला अटक केली होती. आता या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता या पोलिस स्टेशनमधील सर्व पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना क्वॉरंटाइन केले आहे. एसआरपी जवानालाही लागण झाल्यामुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.

हेही वाचा.. ...अन्यथा परिस्थिती आणखी हाताबाहेर जाईल, या आमदाराने दिला राज्य सरकारला इशारा!

दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या अजूनही नियंत्रणात येत नसल्याने सरकारने लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यासाठी वाढवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शनिवारी देशातील जनतेला संबोधित करणार आहे.

First published: May 1, 2020, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading