मुंबई महापौर निवडणुकीच्या तोंडावर BMC कॉन्ट्रॅक्टर्सवर Income Tax चे छापे

मुंबई महापौर निवडणुकीच्या तोंडावर BMC कॉन्ट्रॅक्टर्सवर Income Tax चे छापे

सध्याच्या राज्यातल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या छाप्यांना महत्त्व प्राप्त झालंय. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, मुंबई 14 नोव्हेंबर : राज्याच्या सत्ताकारणात शिवसेनेने भाजपची सोडलेली साथ, राज्यात असलेली राजकीय अस्थिरता आणि तोंडावर आलेली महापौरपदाची निवडणूक, या पार्श्वभूमीवर BMC कॉन्ट्रॅक्टर्सवर Incom Taxचे छापे पडले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातल्या 37 ठिकाणी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्सवर इन्कम टॅक्सने छापे घातले. Incom Taxच्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील एन्ट्री ऑपरेटरवरही छापे घालण्यात आलेत. या छाप्यांमध्ये इन्कम टॅक्सला 735 कोटींच्या बोगस एन्ट्री आणि बनावट खर्चाचे पुरावे सापडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. बीएमसीसाठीच्या सरकारी प्रकल्पांच्या निधीचे पैसे लाटल्याचं इन्कम टॅक्सला आढळल्याची माहिती पुढे आलीय.  सध्याच्या राज्यातल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या छाप्यांना महत्त्व प्राप्त झालंय. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

हिंमत असेल तर अडवा, राजभवनावर रात्री 12 वाजता धडकणार - बच्चू कडू

शिवसेनेची भाजपवर सडकून टीका

'राजकारणात किमान नैतिकतेची अपेक्षा आहे. सुरू असलेली नैतिकता नाही. अमित शहा हे लोकसभा निवडणुका होईपर्यंत का बोलले नाहीत की समसमान सत्तावाटपाचं काही ठरलं नाही. आम्ही व्यापारी नाही. आम्ही शब्दाला जागतो,' असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'निवडणूक काळातच आम्ही वारंवार सांगत होतो की देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, तेव्हा शिवसेना का बोलली नाही,' असा सवाल अमित शहा यांनी केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तसंच कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जाणीवपूर्वक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.

शिवसेना पुन्हा भाजपसोबत जावी म्हणून 'हा' नेता करणार प्रयत्न

काय म्हणाले संजय राऊत?

'आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं. आम्ही असत्याचा आधार घेऊन कधी राजकारण केलं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत सत्तावाटपाच्या गोष्टी ठरल्या. बंद दरवाजाआडची चर्चा शाहांनी मोदींना सांगितली नाही. शिवसेनेनं कधी राजकारणाचा व्यापार केला नाही. बंद दरवाजाआड दिलेली आश्वासनं जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हाच ती उघड होतात. आम्ही पंतप्रधानांचा नेहमीच आदर केला आणि करत राहाणार बंद दराआडच्या फॉर्म्युल्याच्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत,' असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BMC
First Published: Nov 14, 2019 06:19 PM IST

ताज्या बातम्या