मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अखेर शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईकरांचं स्वप्न होणार पूर्ण; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

अखेर शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईकरांचं स्वप्न होणार पूर्ण; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 22 जुलै : आतापर्यंत अनेक सरकारांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच स्वप्न दाखवलं. अखेर ते सत्यात उतरणार असल्याचं दिसून येत आहे. अखेर बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच मुंबईकरांच स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. ( Big announcement of Jitendra Awhad)

जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 27 जुलै रोजी पुनर्विकासाचा भूमिपूजन समारंभ होणार असून हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित पार पाडणार आहे. त्यापुढे त्यांनी या भूमिपूजनाची इतिहासात नोंद होईल असाही उल्लेख केला आहे.

हे ही वाचा-कौतुकास्पद! देवेंद्र फडणवीस यांची स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना मोठी मदत

बीडीडी चाळ पुनर्विकासात निवासस्थान हे दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी पोलीस दलाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या निवासस्थानांपैकी काही निवासस्थाने दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडेही आहेत. काही दिवसांपूर्वी याबाबत एक बैठक झाली होती. या बैठकीत दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणालाही पुनर्वसनापासून वंचित ठेवले जाणार नाही. बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे तो सुनियोजितपणे पूर्ण होईल असे प्रयत्न आहेत.

First published:

Tags: Jitendra awhad