मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी!

BREAKING : मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी!

 दोन दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

दोन दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

दोन दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 30 डिसेंबर : एकीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे, तर दुसरीकडे कोरोना (corona) पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मुंबईमध्ये गेल्या तीन (Mumbai corona cases) दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 3 हजाराच्या पुढे गेली आहे. मुंबई महापालिकेच्या शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार, गेल्या 24 तासात मुंबईमध्ये तब्बल 3671 नवे रुग्ण आढळले आहे. मागील तीन दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. तर 371 रुग्ण आज बरे झाले आहे. दोन दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी सुद्धा मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली. एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले होते. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत होते.  तर बुधवारी एकाच दिवसामध्ये कोरोनाचे 2510 नवे रुग्ण आढळून आले होते. ('या महान माणसाच्या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेय..') गेल्या तीन ते चार दिवसांतील आकडेवारीवरून महाराष्ट्रात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबईतील प्रमाण सतत 55 टक्क्यांच्या वर नोंदवलं गेलं आहे. मुंबईसाठी ही चिंताजनक बाब असून नागरिकांची काळजी यामुळे वाढली आहे. मुंबईत नवी नियमावली जाहीर दरम्यान, ओमायक्रॉन या कोविड विषाणूच्या प्रसारासह एकूणच कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने राज्य सरकार अतिदक्ष झाले आहे मुंबई कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. - नववर्ष स्वागताचे कार्यक्रम / समारंभ / पार्टी आयोजित न करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. हॉटेल्स्, उपहारगृहं यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्याचे योग्यरीतीने पालन होते आहे, यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांनी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करावी. स्थानिक पोलीस उपायुक्तांशी समन्वय साधून या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱयांचा देखील समावेश करावा. - नववर्ष स्वागत प्रतिबंधात्मक आदेश तसेच कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या हॉटेल्स्, उपहारगृहांवर सक्त कारवाई करावी. - सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या अखत्यारितील हॉटेल्स्, उपहारगृहं यांचे दैनंदिन फुटेज तपासून उपस्थितीचे नियम पाळले जात असल्याची खातरजमा करावी. - मालाड येथील कोविड उपचार केंद्र हे लहान मुलांवर उपचारांसाठी महत्त्वाचे आहे. या केंद्रासह कांजूरमार्ग येथे उभारलेले कोविड उपचार केंद्र देखील लवकरात लवकर कार्यान्वित करावे. - दुबईमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना सक्तीने सात दिवस गृह विलगीकरण करण्याचे निर्देश व त्याअनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका प्रशासनाने दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी आदेश दिले आहेत. या आदेशांमध्ये आता फक्त दुबईऐवजी संपूर्ण संयुक्त अरब अमिराती देशांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच  संयुक्त अरब अमिराती (यूएई) देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर आगमनप्रसंगी आरटीपीसीआर (ऑन अरायव्हल टेस्टींग) चाचणी करावी लागेल. या चाचणीच्या अहवालासापेक्ष व प्रचलित नियमानुसार संबंधित प्रवाशांचे विलगीकरण ठरविण्यात येईल. - हवाईमार्गे मुंबईत येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधून, ज्या बाधितांना लक्षणे नाहीत (एसिम्प्टोमॅटिक) आणि औषधोपचाराची देखील गरज भासत नाही, अशा रुग्णांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल व गोरेगावातील नेस्को या दोन्ही कोविड उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी ५०० रूग्णशय्यांची स्वतंत्र विलगीकरण व्यवस्था कार्यान्वित करावी. अशा एसिम्प्टोमॅटिक रुग्णांना तेथे निशुल्क विलगीकरणात राहता येईल. जे रुग्ण सशुल्क विलगीकरण व्यवस्थेसाठी तयार असतील, त्यांना निर्देशित हॉटेल्स् मध्ये राहण्याची परवानगी देण्यात येईल. या उपाययोजनेमुळे रुग्णालयांमधील रुग्णशय्या विनाकारण अडकून राहणार नाहीत व वैद्यकीय सेवेवरचा ताणदेखील कमी होईल. - विमानतळावर, रॅपिड टेस्टमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करावी. ती चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रचलित नियमानुसार विलगीकरणाची कार्यवाही करावी. जर चाचणी पॉजिटिव्ह आली तर त्या रुग्णास प्रचलित नियमानुसार विलगीकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच नियमित आरटीपीसीआर चाचणीचेच नमुने जनुकीय सूत्रनिर्धारण तपासणी (जिनोम सिक्वेसिंग) साठी पाठवावे. - प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये, कोविड बाधितांच्या विलगीकरणासाठी किमान ५०० व्यक्ती क्षमतेचे कोविड काळजी केंद्र (सीसीसी २) लवकरात लवकर कार्यान्वित करावेत. - सर्व विभाग कार्यालयांमधील विभाग नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) मध्ये येत्या दोन महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त संख्येने नेमण्यात येणार आहेत. गृह विलगीकरणात राहत असलेल्या रुग्ण व व्यक्तींचा पाठपुरावा करण्यासह इतर वैद्यकीय सेवांसाठी या प्रशिक्षणार्थींच्या सेवा उपयोगात येतील. - सर्व रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रामधील मनुष्यबळ, संयंत्रे व इतर यंत्रणा, औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा कसे, याचा आढावा घेवून त्यामध्ये कमतरता राहणार नाही, याची खात्री करावी.
First published:

पुढील बातम्या