16 जून : भाजपचं मिशन २०१९ विधानसभेत 2०० जागा आणि लोकसभेसाठी ४८ जागा जिंकण्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना टार्गेट दिलंय. पक्षानं दिलेलं टार्गेट पुर्ण करा,ज्याला पेलवलं जात नसेल त्याने आताच सांगा,पुढची व्यवस्था आम्ही बघू अशी तंबीही शहांनी दिलीये.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना अमित शहा तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर आले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करण्यासाठी रविवारी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्याआधी त्यांनी भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी येणाऱ्या 2019च्या विधानसभेत 200 जागा तर लोकसभेत 48 च्या 48 जागा जिंका असा आदेशच अमित शहांनी नेत्यांना दिला.
तसंच बुथ लेव्हलपर्यंत पक्षाची बांधणी करा. यूपीमध्ये मी ३०० जागा येतील असं सांगितल होतं. त्यावेळी आम्हाला हसण्यावारी नेलं होतं. आता मी महाराष्ट्रात २०० जागांचं टार्गेट देतोय असंही अमित शहा यांनी जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना धडे दिले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा