चक्रीवादळाच्या पहिल्याच तडाख्यात मुंबईतल्या नालेसफाईची पोल खोल

चक्रीवादळाच्या पहिल्याच तडाख्यात मुंबईतल्या नालेसफाईची पोल खोल

ज्या ठेकेदारांना नालेसफाईचे काम देण्यात आलं होतं त्यांनी नेमकी काय नालेसफाई केली. केली याची चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

  • Share this:

मुंबई 3 जून: मुंबईत निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडला आणि या पावसाने मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पोल-खोल केली आहे. विक्रोळी पारसाईट येथील रामनगर या डोंगरावरील नालेसफाई पूर्ण झाली नसल्यामुळे पहिल्याच पावसात नाल्यांतून पाण्यासोबत कचरा वाहून आलेला पाहायला मिळाला. तीव्र उतार असल्यामुळे या ठिकाणी कचरा वेगाने वाहत येत होता आणि बाजूला उभ्या असलेल्या मोटरसायकलींवर जाऊन आदळत होता आणि त्यासोबतच मोटरसायकल सुद्धा वाहून जात असल्याचं चित्र या भागात दिसलं.

त्याच बरोबर हे पाणी झोपड्यांमध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या मीटरवर सुद्धा जाऊन आदळत होतं. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही परंतु यामुळे मात्र पालिकेने नालेसफाई केल्याची पोल-खोल समोर आली आहे. आत्ताच मोसमी पूर्व पाऊस झाला त्यामध्ये अशी परिस्थिती आहे तर येणाऱ्या दिवसात अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे आणि त्यात कशाप्रकारे मुंबईकरांचे मोठे हाल होऊ शकतात अशी भीती नारिकांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेने तातडीने लक्ष घालून पुन्हा काम करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. ज्या ठेकेदारांना नालेसफाईचे काम देण्यात आलं होतं त्यांनी नेमकी काय नालेसफाई केली. केली याची चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

हे वाचा -

VIDEO : दंडाची पावती द्या नाहीतर...भररस्त्यात तरुणीचा हायवोल्टेज ड्रामा

Nisarga Effect : चक्रीवादळामुळे चारजणं जखमी; अद्याप जीवितहानी नाही

First published: June 3, 2020, 5:48 PM IST
Tags: BMCmumbai

ताज्या बातम्या