अखेर ठरलं! महाआघाडी सरकारचं महामंडळ वाटप अंतिम टप्यात, नाराजांची लागणार वर्णी

35 ते 40 महामंडळांवर या नियुक्त्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेले अनेक दिवस त्यावर चर्चा सुरू होती.

35 ते 40 महामंडळांवर या नियुक्त्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेले अनेक दिवस त्यावर चर्चा सुरू होती.

  • Share this:
मुंबई 18 सप्टेंबर: महाआघाडी सरकारचे महामंडळ वाटप अंतिम टप्यात आले आहे, त्याची लवकरच घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली त्यात महामंडळाच्या वाटपावर चर्चा करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. ज्या विभागाचे मंत्रिपद नाही त्या पक्षाला महामंडळाचं अध्यक्षपद या धोरणानुसार महामंडळ च वाटप होईल. यानुसार सिडको- काँग्रेस, म्हाडा- शिवसेना तर महिला आयोग- राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. मंत्रीपदाच्या संख्यावाटपाच्या प्रमाणात महामंडळ वाटप होणार असून सदस्य संख्याही त्याच आधारावर ठरणार आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हे सरकार असल्याने प्रत्येक पक्षाला मंत्रिपदं विभागून देण्यात आली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात मोजक्याच नेत्यांची वर्णी लागली.  त्यामुळे अनेक जण नाराज आहेत. महामंडळाच्या वाटपात त्या नाराजांना सामावून घेतलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 35 ते 40 महामंडळांवर या नियुक्त्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारमध्ये असलेल्या तीन पक्षांमध्ये अनेक प्रश्नावर कुरबुरी वाढल्या आहेत. समन्वयाचा अभाव असल्याचेही अनेकदा उघड झाले आहे. COVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू त्यामुळे महामंडळाचं वाटप करतांना चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून त्याला अंतिम रूप देण्यात आल्याची माहिती आहे. इंदू मिलमध्ये कार्यक्रम नाराजी नाट्यानंतर लांबणीवर मुंबईतील दादर इथं इंदू मिलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. परंतु, अपुऱ्या नियोजनाअभावी शुक्रवारी नियोजित केलेल्या पायाभरणीचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करावा लागला. या कार्यक्रमाच्या नियोजनातच त्रुटी होती, अशी कबुलीच राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली. तर लवकरच कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम नियोजन करताना त्रुटी होत्या अनेकांना निमंत्रण नव्हते. मी कॅबिनेट मंत्री असूनही मला देखील निमंत्रण नव्हते. या त्रुटी दूर करून आता पुन्हा कार्यक्रम नियोजन केले जाईल, अशी माहिती मलिक यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन करत असताना आंबेडकर यांच्या वारसांना याबद्दल माहिती दिली गेली नाही, काही नेत्यांना आणि मंत्र्यांना ही याची माहिती दिली नव्हती त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता, असंही मलिक यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातला जवान लेह-लडाख सीमेवर शहीद, गावावर शोककळा विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याहून सकाळीच निघाले होते. त्यांचा ताफा हा वाशीपर्यंत पोहोचला होता. ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आला अशी माहिती कळताच अजितदादांना यू-टर्न घ्यावा लागला. त्यांनी वाशीवरूनच आपला ताफा वळवत पुन्हा पुण्याच्या दिशेनं प्रवास सुरू केला. तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे पायाभरणी कार्यक्रमासाठी हजर राहण्यासाठी इंदू मिलच्या परिसरात पोहोचले ही होते. पण, कार्यक्रम रद्द झाल्याचे कळताच धनंजय मुंडे यांनाही माघारी परतावे लागले.
Published by:Ajay Kautikwar
First published: