17 एप्रिल : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरु होणार आहे. अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा आजपासून पुन्हा वसई खाडीमध्ये शोध घेतला जाणार आहे. आतापर्यंत अश्विनी यांच्या प्रकरणात अनेक तपास झाले पण त्यांना शोधण्यात पोलीस यंत्रणा कमी पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे आधुनिक साधनांची मदत घेत पुन्हा शोधमोहीम सुरु होणार आहे.
या शोधमोहिमेसाठी आता खाजगी कंपनीची मदत घेण्यात येणार आहे. कंपनीकडे समुद्रात काम करण्यासाठी वापरण्यात येणारी आधुनिक यंत्र सामुग्री असल्याने त्याचा वापर आता या शोधमोहिमेसाठी करण्यात येणार आहे.
कोण आहे अश्विनी बिद्रे?
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे... मुळगाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातलं आळते गावं. एमपीएससीची परीक्षा देऊन अश्विनी या महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्या 2006 साली. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली. होय... त्यानंतर त्यांनी पतीशी संबंध तोडले आणि परस्पर प्रपंच थाटला. ही घटना घडली तब्बल दीड वर्षांपूर्वी. तेव्हापासून एपीआय बिद्रे या बेपत्ता आहेत.
विशेष म्हणजे अश्विनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली गेली. त्यानंतरही तपास लागत नाही म्हटल्यावर अश्विनीच्या भावानं आणि वडिलांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आजही अश्विनीचे वडील हे तिची वाट पाहताहेत. मात्र अश्विनी यांच्याबाबत काहीच ठोस माहितीसमोर आली नाही.
काय आहे प्रकरण?
अश्विनी बिद्रे यांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. शरीराचे तुकडे करून पिशवीत भरून खाडीत टाकून देऊन विल्हेवाट लावली असल्याचा पोलिसांचा दावा केला होता. पण हत्यार आद्यप हस्तगत झालेली नाहीत. या प्रकरणी खून आणि पुरावा नष्ट करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फळणीकरला अजून एक दिवसाची पोलीस कोठडीही ठोठावण्यात आली होती.
दरम्यान, पोलिसांच्या तपास अद्याप अश्विनी यांचा तपास लागलेला नाही आहे. त्यामुळे नवीन साधनांचा वापर करून त्यांच्या मृतदेहाची शोध मोहिम पुन्हा सुरू करणार आहेत.
संबंधित बातम्या
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा