मुंबई 16 एप्रिल: लॉकडाऊनच्या काळात सध्या सगळे लोक घरात आहेत. रस्त्यांवर अगदी मोजकीच वाहनं धावताहेत. पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमधल्या पोलिसांच्या कारवाईवाईचे आकडे जरी बघितले तरी आश्चर्याचा धक्का बसल्याशीवाय राहात नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत 50 हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.10 हजार व्यक्तींना अटक करण्यात आलीय तर 32 हजार वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 102 घटना घडल्या असून यात 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते 17 एप्रिल या कालावधीत 49,756 गुन्हे दाखल झाले आहेत तर 10,276 व्यक्तींना अटक करण्यात आली तर 32,424 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
या काळात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का मारला अशा 555 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उलंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 1,82,76,744 (1 कोटी 82 लाख 76 हजार 744) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
मुंबईत कोरोना चाचण्या कमी करणं धोक्याचं; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. यात आत्तापर्यंत सात पोलीस अधिकारी व 23 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
धारावी हे मुंबईतलं कोरोनाचं मोठं हॉटस्पॉट बनलं आहे. दररोज रुग्ण सापडण्याच्या संख्येत वाढ होत आहे. धारावीमध्ये आज कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळले. त्यामुळे धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुस्लिम नगरमध्ये सर्वात 21 रुग्ण आहेत. तर त्यानंतर मुकुंद नगरमध्ये 18 रुग्ण आहे. धारावीतला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने मिशन धारावी ही मोहिम सुरू केली असून तिथल्या तब्बल साडेसात लाख लोकांचं स्क्रिनिंग करण्याची सरकारची योजना आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हे स्क्रिनिंग पूर्ण होणार आहे.
मुंबईत तैनात होती SRPFची तुकडी, 175 जवानांच्या संपूर्ण ग्रुपला केलं क्वारंटाईन
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गुरुवारी कोरोनाबाधित 286 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3202 झाली आहे. दिवसभरात 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 300 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 3, पुण्यातील 4 आहेत. त्यापैकी 5 पुरुष तर 2 महिला आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 194 झाली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 7 जणांपैकी 6 रुग्णांमध्ये ( 86 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.