कोरोनाबाधितांच्या संख्येने ठाण्याला हादरा, एकाच दिवसात 15 जणांचा मृत्यू

कोरोनाबाधितांच्या संख्येने ठाण्याला हादरा, एकाच दिवसात 15 जणांचा मृत्यू

ठाणे महानगरपालिकेतील जवळपास 70 टक्के आरोग्य सेवा कर्मचा-यांना गेल्या 3 महिन्यांपासून वेतन दिलं गेलं नाहीये असा धक्कादायक माहिती पुढे आलीय.

  • Share this:

ठाणे 19 मे: मुंबई नंतर आता ठाण्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आज एकाच दिवसांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याने ठाणे हादरलं आहे. तर एकून कोरोनाबाधितांचा आकडा २ हजारांच्या वर गेलाय. गेल्या काही दिवसांमध्ये बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन हादरून गेलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच आकडा वाढत असल्याने त्याला रोखायचं कसं असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.

एकीकडे करोना योद्धा म्हणुन आरोग्य कर्मचारी डाॅक्टर, नर्सेस आणि कर्मचा-यांचा गुणगौरव केला जातोय तर दुसरीकडे मात्र ठाणे महानगरपालिकेतील जवळपास 70 टक्के आरोग्य सेवा कर्मचा-यांना गेल्या 3 महिन्यांपासून वेतन दिलं गेलं नाहीये असा धक्कादायक खुलासा ठाणे महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे. यामुळे ठाणे महानगर पालिकेचे 70 टक्के आरोग्य कर्मचारी कोणत्याही क्षणी काम बंद करु शकतील अशी परिस्थिती एकंदर ठाण्यात निर्माण झाली आहे.

कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य सेवेत असलेले कर्मचारी रात्रीचा दिवस करुन आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये पालिकेच्या सेवेत असलेल्या कार्डीयाक रुग्णवाहिका चालकांचाही समावेश आहे. ठाणे पालिकेच्या सेवेते कार्डीया रुग्णवाहिका चालविणारे 26 चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही. तर, सुमारे 200 पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोना बाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत.

तर मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या साडेबावीस हजारावर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 800 मृत्यू झाला. मुंबईत आज एकाच दिवसात 1411 रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णाची संख्या 22563 वर पोहोचली आहे.

Coronavirus मुळे आज 43 लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 800 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 600जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 6816 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

पुण्यातही रुग्ण वाढले

पुण्यात दिवसभरात 149 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात आज 8 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 110 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.  156 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.  पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3747 झाली आहे आतापर्यंत 207 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 1920 जणांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं आहे.

कोरोनावर उपचारासाठी भरावं लागणार बिल, या महापालिकेनं जाहीर केलं दरपत्रक

पुणे परिसरात आता मायक्रो कंटेन्मेंट झोननुसार प्रतिबंधांची नियमावली करण्यात येत आहे. या छोट्या प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम कडक असतील, तर इतरत्र व्यवहारांना सुरुवात करण्यास परवानगी देण्यात येईल.

कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षाही रद्द होणार? UGC ला राज्याकडून पत्र

प्रतिबंधित क्षेत्रात केवळ जीवनावश्यक सुविधा सुरू राहणार. यामध्ये दूध, किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकाने, दवाखाने, स्वयंपाकाचा गॅस या व्यतिरिक्त इतर सुविधांना परवानगी नाही.

31 तारखेपर्यंतच्या लाॅकडाऊनसाठी नवी नियमावली तयार करण्यात येईल. त्यामध्ये पथारी व्यावसायिकांनाही ठराविक रस्ते वगळता व्यवसाय करता येणार आहे.

आरोग्यमंत्र्यांचे रुग्णवाढीचे संकेत

कोरोनाची स्थिती सरकारच्या ताब्यात आहे. १ लाख बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. मात्र असं असलं तरी घाबरण्याचे कारण नाही. सरकारी हॉस्पिटल्समधली 80 टक्के बेड्स सरकारने ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी आज दिली.

 

First published: May 19, 2020, 10:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading