ठाण्यामधल्या विनयभंग प्रकरणी रिक्षा चालक आणि सहप्रवाशाला अटक

ठाण्यामधल्या विनयभंग प्रकरणी रिक्षा चालक आणि सहप्रवाशाला अटक

20 ठिकाणचे cctv तपासून काल संध्याकाळी संतोष लोखंडे आणि लुईस वाडी इथे राहणारा आरोपी लहू घोगरे या दोघांना अटक केली.

  • Share this:

14 जून : गेल्याच आठवड्यात ठाण्यामध्ये एका मुलीचा विनयभंग करून तिला रिक्षातून फेकण्यात आलं होतं. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपास हाती घेतला होता. अखेर सहप्रवासी आणि रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. नौपाडा पोलिसांनी रिक्षाही ताब्यात घेतली आहे.

रिक्षा विनयभंग प्रकरणी नौपाडा पोलिसांनी 4 पोलीस पथकं काम करत होती.  20 ठिकाणचे cctv तपासून काल संध्याकाळी संतोष लोखंडे आणि  लुईस वाडी इथे राहणारा आरोपी लहू घोगरे या दोघांना अटक केली. लहू हा रेकॉर्डवरील आरोपी आणि संतोषवर देखील आधीचे 2 गुन्हे दाखल आहेत.

First published: June 14, 2017, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading