ठाण्यात टोईंग कर्मचाऱ्यांनी केला तरुणीचा विनयभंग आणि मारहाण

ठाण्यात टोईंग कर्मचाऱ्यांनी केला तरुणीचा विनयभंग आणि मारहाण

तिनं जेव्हा याला प्रतिकार केला, तेव्हा तिला आणि ती ज्या रिक्षात बसली होती, त्या रिक्षाचालकाला जबर मारहाण केली. या 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

  • Share this:

ठाणे, 21 आॅगस्ट :  ठाण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चाललाय. कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोइंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी एका तरुणीची छेड काढली. तिनं जेव्हा याला प्रतिकार केला, तेव्हा तिला आणि ती ज्या रिक्षात बसली होती, त्या रिक्षाचालकाला जबर मारहाण केली. या 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

हा प्रकार वाहतूक पोलिसासमोर झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलाय. त्यांनीच या आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. मुलगी सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहे, गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.

यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतो, की हा प्रकार घडत असताना टोइंग व्हॅनवरचा पोलीस कर्मचारी काय करत होता. टोइंग व्हॅनवरचे कर्मचारी कंत्राटी असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 09:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading